आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसच्या पहिल्या बळीची पुष्टी झाली आहे. कर्नाटकात मंगळवारी 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचे नमुने पाॅझिटिव्ह आले आहेत. देशातील रुग्णांचा आकडा 78 वर पाेहोचला आहे. केरळ व दिल्लीत मल्टिप्लेक्स बंद केले आहेत. 31 मार्चपर्यंत जेथे परीक्षा नाही त्या शाळा व काॅलेज बंद राहतील. दुसरीकडे, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारे दोन्ही सामने आता प्रेक्षकांविनाच होणार आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी दिल्लीत आयपीएलसह सर्वच क्रीडा आयोजनांवर बंदी लावण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती जारी केली.
महाराष्ट्रात 14 रुग्ण, सर्वाधिक पुण्यात
आंध्र प्रदेशात गुरुवारी कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इटलीहून 6 मार्च रोजी नेल्लोरला ही व्यक्ती परतली होती. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर 5 संशयित रुग्णांना सुद्धा क्वारंटाइन (वेगळे ठेवण्यात आले) करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, वृत्तसंस्थेने महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या सुत्रांकडून दिलेल्या माहितीप्रमाणे, राज्यातील रुग्णांची संख्या 14 पेक्षा अधिक झाली आहे. पुण्यात गुरुवारी सापडलेला नवीन रुग्ण नुकताच अमेरिकेतून परतला होता. एकट्या पुण्यातच आतापर्यंत सर्वाधिक 9 कोरोना व्हायरस बाधित रुग्ण सापडले आहेत.
राष्ट्रपती भवन पर्यटकांसाठी बंद
कोरोना व्हायरसचा धोका पाहता राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि परिसर तसेच चेंज ऑफ गार्ड समारंभ सामान्य जनतेसाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवन सुद्धा 13 मार्च पासून पुढील नोटीसपर्यंत बंदच राहील. राष्ट्रपती भवनाकडून गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.
आयपीएलवर संकट
व्हिसा निलंबित केल्याने 60 परदेशी खेळाडू येऊ शकणार नाहीत. तथापि, 14 मार्चला आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत आयपीएल होणार की नाही, याचा निर्णय होणार आहे.
इस्रायली वैज्ञानिकांचा दावा
लस तयार, लवकरच घोषणा केली जाणार, इस्रायली पीएमच्या अखत्यारीत असलेल्या बायोलाॅजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक लसीची घोषणा करू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.