आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus: 28 Confirmed Cases In India, Modi To Avoid Holi Event News And Updates

होली मिलन समारंभात सहभागी होणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतात एकूण 28 रुग्ण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभर कोरोनाव्हायरसचे आतापर्यंत 28 रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी दिली. त्यातच कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाच्या होली मिलन समारंभात सहभागी होणार नाही अशी घोषणा केली आहे. तज्ञ मंडळींनी आपल्याला एका ठिकाणी जमा होण्यास मनाइक केली आहे. त्यामुळे, मी या कार्यक्रमात सहभागी नाही होण्याचा निर्णय घेतला असे मोदींनी ट्विट केले आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत 3000 चाचण्या झाल्या आहेत. 15 पेक्षा अधिक लोकांचे लॅबमध्ये परीक्षण केले जात आहे. कोरोनाव्हायरसचे संक्रमण तोंडातील पाण्याने वाढू शकते. याची खास काळजी घ्यायला हवी. लोकांनी मास्क लावून बाहेर पडावे आणि हात व्यवस्थित धूत राहावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्य तो टाळावे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) देशाची सर्वात जुनी प्रयोगशाळा आहे. आरोग्य विभाग या प्रयोगशाळेच्या संपर्कात आहे.  

बातम्या आणखी आहेत...