आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus China Vs US: China On US Over Coronavirus After Cases And Death Toll Rises In Wuhan

चीनमध्ये कोरोना व्हायरस आणण्यात अमेरिकन लष्कराचा हात! अमेरिकेच्या आरोपानंतर चीनचा पलटवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग / वॉशिंग्टन - जगभरात कोरोना व्हायरसची दहशत असताना या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये वाकयुद्ध सुरू आहेत. हे दोन्ही देश कोरोनाच्या जगभरातील फैलावासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. चीनने वेळीच कारवाई केली असती तर जगभरात हा व्हायरस पसरला नसता असे अमेरिकेने म्हटले होते. त्यावर पलटवार करताना, आम्हाला तर चीनच्या वुहानमध्ये हा व्हायरस अमेरिकन लष्करानेच सोडल्याची शंका आहे असा खळबळजनक आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. 

चीनने केलेल्या विलंबाचा फटका इतर देशांना -अमेरिका

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी गुरुवारी रात्री उशीर एक ट्विट केले. त्यानुसार, "कोरोना व्हायरसवर अमेरिका पारदर्शक का नाही? असेही होऊ शकते की कोराना व्हायरस अमेरिकन लष्कराच्या माध्यमातून आमच्या वुहान शहरात पोहोचला." झाओ यांची प्रतिक्रिया येण्याच्या अवघ्या 24 तासांपूर्वी अमेरिकेने सुद्धा चीनवर आरोप केले होते. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतरही चीन प्रशासनाने उशीरा कारवाई केली. चीनच्या दप्तर दिरंगाई कारभारामुळे इतर देशांना त्याचा फटका बसला आणि जगभरात व्हायरस पसरला. दरम्यान, शुक्रवारी या व्हायरसमुळे मृतांची संख्या 4983 वर पोहोचली आहे.

असा सुरू झाला अमेरिका आणि चीनचा 'कोरोनावाद'
अमेरिका आणि चीनमध्ये कोरोना व्हायरसवरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका बुधवारपासून सुरू झाली. अमेरिकेचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार रॉबर्ट ओ'ब्रायन यांनी चीनवर थेट आरोप केला होता. ते म्हणाले होते, की "कोरोना व्हायरसवर चीनने उपाययोजना करण्यात विलंब केला. याचाच फटका दोन महिन्यानंतर इतर देशांना बसला. दोन महिन्यांपूर्वीच चीनने या व्हायरसचा पत्ता लावला असता तर त्याचा निपटारा करण्यासाठी तयारी केली असती." ओ'ब्रायन यांच्या आरोपानंतर चीनने संताप व्यक्त केला. त्यावरच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दोन ट्विट करून आपला रोष व्यक्त केला. यामध्ये अमेरिकेने चीनवर आरोप करण्यापेक्षा स्वतःचा डेटा जगजाहीर करावा. असेही झाओ म्हणाले आहेत. परंतु, अमेरिकेच्या लष्करावर आरोप करताना त्यांनी कुठल्याही प्रकारचे पुरावे दिले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...