आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली : डाॅक्टरांवर दबाव, वृद्धांना वाऱ्यावर सोडा; चीननंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या इटली, इराणमधून ग्राउंड रिपोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इराण : २३ इराणी नेत्यांना संसर्ग, अनेक डॉक्टर आणि नर्सचाही मृत्यू
  • भारत : पहिली रुग्ण म्हणाली, ‘मी बरी होईन हे मला ठाऊक होते’

मिलान, पाविया आणि रोमहून टीम पार्क्स, बेप्पी सेवरजिनिनी, जॅसन होरोविट्झ 

इटली : १५-१५ तास काम करताहेत डॉक्टर. कोणाला वाचवायचे, कोणाकडे दुर्लक्ष करायचे याची निवड कठीण


‘आयसीयूमध्ये गर्दी, जे राहिलेत त्यांना मरण्यासाठी सोडून दिले’


गेल्या आठवड्यात लोम्बार्डीतील लहान शहर बर्गामोचे महापौर जॉर्जियो गोरी यांनी ट्विट केले- आयसीयूत एवढी गर्दी झाली की, ज्यांच्यावर उपचार होत नाहीयेत त्यांना मरण्यासाठी सोडून दिले जात आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ज्यांची जगण्याची आशा नाही अशा रुग्णांकडे दुर्लक्ष करण्याचे डाॅक्टरांना सांगितले जात आहे.



इटलीतील सर्वात संपन्न शहरांपैकी एक मिलानच्या रेल्वेस्थानकावर गर्दी आहे. दक्षिण इटलीतील अनेक जण मिलानमध्ये राहत असल्याने बहुतांश जण तिकडे जाण्यासाठी रेल्वे पकडायला आले आहेत. सरकारकडून प्रयत्न सुरू असले तरी उत्तर इटलीत १.४ कोटी जण लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. मात्र, हजारो जण आपल्यासोबत विषाणू घेऊन तेथून निघून गेले आहेत. दक्षिण भागातील अनेक गव्हर्नरांना उत्तरेकडून येणाऱ्या लोकांवर बंदी घालायची आहे. आता तर पूर्ण इटलीच बंद करण्यात आली आहे. वयस्करांवर उपचार न करण्याचा दबाव डाॅक्टरांवर टाकला जात असल्याची तक्रार एका शहराच्या महापौराने केली आहे. ज्यांची वाचण्याची शक्यता आहे आणि ज्यांचे वय कमी आहे त्यांनाच आयसीयूत ठेवा, असे निर्देश दिले जात आहेत. सरकार स्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अाहे. सरकारने ८.४ अब्ज डाॅलर खर्च करण्याची घोषणा केली. ज्या पालकांची मुले शाळेत जातात त्यांना बेबीसीटिंग व्हाउचर्स दिले जातील. म्हणजे ते घरीच मुलांची देखरेख ठेवू शकतील. वैद्यकीय उपकरणांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे.लहान शहरांचेही चित्र वेगळे नाही. पाविया नामक शहरात ७५ लोक राहतात. सुपरमार्केट आणि औषधांची दुकाने वगळता सर्व उद्योग बंद करण्यात आले आहेत.
 
 

१८ हजार बाधित होण्याची भीती

मास्क घातलेली एक नर्स थकून बेशुद्ध झाल्याचे छायाचित्र व्हायरल होत आहे. यातून वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर किती ताण अाहे हे दिसते. मेट्रो, जिम, चित्रपटगृह, शाळा, विद्यापीठ सर्व बंद आहेत. परिषदा, क्रीडा, प्रार्थनासभा सर्व रद्द झाल्या आहेत. ९०% आरक्षण रद्द झाल्याची तक्रार हॉटेल मालकांची आहे. गेल्या शनिवारी लोम्बार्डीतील आयसीयूप्रमुख अँटोनियो पेसेंती यांनी सांगितले,त्यांचा अंदाज आहे की, २६ मार्चपर्यंत तेथील १८ हजार जण आजारी पडलेले असतील. दरम्यान, युरोपियन अंतराळ संस्थेने वृत्त दिले आहे की, लॉकडाऊनमुळे इटलीतील अनेक भागातील प्रदूषण कमी झाले आहे.
 

इराण : २३ इराणी नेत्यांना संसर्ग, अनेक डॉक्टर आणि नर्सचाही मृत्यू

तेहरानचे वली अस्त्र चौकावर डॉक्टरांचे आभार व्यक्त करणारे फलक लावण्यात आले आहेत. डॉक्टर राष्ट्रीय हीरो होत आहेत.

तेहरानहून जफर मेहदी

कोरोना व्हायरस पसरल्यानंतर सध्या इराणच्या राजधानीत स्मशानशांतता आहे. इराणमध्ये तीन आठवड्यांपूर्वी तेहरानपासून १५० किमीवरील कौम शहरात कोरोनाचे पहिले प्रकरण समोर आले होते. दोन वयस्करांमध्ये तो आढळला होता. कौम इराणमधील प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. येथून कोरोना तेहरानसह अनेक शहरांमध्ये पसरला. गेल्या तीन आठवड्यांत तेहरानमध्ये सर्वाधिक ४ हजार प्रकरणे समोर आली आहेत. स्थिती पाहून इराणमध्ये लोकांना एका शहरातून दुसऱ्या  शहरात जाण्यावर बंदी घातली आहे. सर्व विद्यापीठे बंद असून लोकांना घरीच राहण्याचे सांगितले जात आहे. आरोग्य विभागाकडून विषाणू रोखण्याचे सर्व प्रयत्न केले जात असले तरी या आठवड्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे २१३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ८५ तर शुक्रवारीच झाले, जे एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू आहेत. एकीकडे तेहरान आणि कौमसह सर्व मोठ्या शहरांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. लोक हिंमतही दाखवत आहेत. तेहरानचे डॉ. हैदर अमिनी सांगतात की, हे मोठे वैद्यकीय संकट आहे. आणीबाणीसारखी स्थिती आहे. मात्र, त्यासमोर झुकण्याचे काहीही कारण नाही. या संघर्षात आपला जीव धोक्यात घालून उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सचे सर्वाधिक योगदान अाहे. यात बाधा झाल्याने काहींनी आपले प्राणही गमावले अाहेत. इराणमधील गिलन येथील २५ वर्षांची नर्गिस खानालिझादेह कोरोना विषाणूमुळे जीव देणारी पहिली नर्स होती. प्रोटेक्टिव्ह सूट आणि सर्जिकल मास्कसोबत तिचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.



शुक्रवारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, बाधित लोकांची संख्या ११ हजार ३६४ आणि मरणाऱ्यांची संख्या ५१४ झाली आहे. बाधितांमध्ये २३ इराणी नेत्यांचाही समावेश आहे. उपराष्ट्रपती मसोमेह इब्तेहरदेखील क्वारंटाइनमध्ये होते आणि आता ते व्यवस्थित होऊन कामावर परतले आहेत. कोरोना व्हायरसवर एक प्रेस ब्रिफिंग करताना एक दिवस आधी उपआरोग्यमंत्री इराज हारीरचीदेखील बाधित झाले आणि अजूनही क्वारंटाइनमध्ये आहेत. आणखी काही रुग्णही बरे झाले आहेत. असेच एक रुग्ण अली अबिदी सांगतात की, ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. साॅफ्टवेअर अभियंते अली सांगतात की, हा माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी भयंकर अनुभव होता. क्वारंटाइन काळादरम्यान मला विचित्र विचार यायचे. आता घरी येऊन चांगले वाटतेय.



बाधितांची संख्या जास्त असल्याची शंका अनेकांना आहे. कार्यकर्ते अमिर्रेझा सांगतात की, इराणमध्ये कोरानाची स्थिती भयंकर आहे. जागतिक मृत्यू दर २ टक्के आहे, तर इराणचा मृत्यू दर ४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री झावाद झरीफ यांनी मान्य केले की, आधुनिक उपकरणे व औषधांच्या तुटवड्यामुळे कोरोनाशी लढणे कठीण जात आहे.



भारत : पहिली रुग्ण म्हणाली, ‘मी बरी होईन हे मला ठाऊक होते’

चेन्नई : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहीम राबवली.


केरळमधून जेसी शिबूचा रिपोर्ट

देशात कोरोनाची सर्वात पहिली पीडिता केरळमधील त्रिशूरमध्ये आढळली होती. आता ती पूर्णपणे बरी आहे. नाव न छापण्याच्या अटीवर पीडितेने भास्करसोबत लागण झाल्यापासून ते बरे होण्यापर्यंतच्या अनुभवाचे कथन केले. 



चीनमध्ये कोरोना पसरल्यानंतर आम्ही दहशतीत होतो. मी वुहान विद्यापीठात शिकत होते. मात्र आम्ही २४ जानेवारीला केरळला परतलो. आम्हाला त्या वेळी वैद्यकीय पथकाशी संपर्क साधण्याबाबत सांगण्यात आले होते. मी माझ्या घरी गेले आणि २५ जानेवारीला वैद्यकीय पथकाला माहिती दिली. तेव्हा मला कोरोना विषाणूच्या संसर्गाची कुठलीही लक्षणे नव्हती. सावधगिरी बाळगण्यासाठी केरळ सरकारच्या आदेशानुसार मी घरी एकटी राहिले. डॉक्टर्स आणि तज्ज्ञांचे पथक माझ्याशी दररोज संपर्क साधून आरोग्य तपासणी करत होते. २७ जानेवारीला मी सकाळी झोपेतून उठली तेव्हा मला घशात थोडा त्रास जाणवत होता, थोडा खोकलाही होता. मला वाटले की, हवामान बदलामुळे झाले असेल. मात्र आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नव्हतो. मी डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. मला तत्काळ त्रिशूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे माझी आणि इतर ३ जणांची लाळ आणि रक्त तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले. दोन दिवसांनंतर इतर तीन जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, मात्र माझा रिपोर्ट पेंडिंग होता. मला थोडी शंका येत होती. ३० जानेवारीला आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली की, चीनमधील एका विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र तोपर्यंत ती विद्यार्थिनी मीच आहे हे मला कोणीही सांगितले नव्हते. दरम्यान, विलगीकरण कक्षात मी आणि आणखी एक विद्यार्थिनी असल्यामुळे माझी शंका अजून वाढली होती. दुसऱ्या विद्यार्थिनीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 



चांगल्या उपचारासाठी मला ३१ जानेवारीला त्रिशूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मला अडचण होऊ नये यासाठी माझी ओळख लपवण्यात आली.



फारशी चिंता नव्हती

माझा रिपोर्ट आला नव्हता किंवा मला सांगितले गेले नव्हते. मात्र माझे लक्षण गंभीर नव्हते. यामुळे मला फारशी चिंता नव्हती. जास्त घाबरल्यास अडचण आणखी वाढेल हे मला माहीत होते. तसेच कोरोनाच्या मृत्युदरापेक्षा बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे याची मला जाण होती. यामुळे मी नकारात्मक विचारांपासून स्वत:चा बचाव करत होती. मी माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचीही पूर्ण माहिती सरकारला दिली. आरोग्यमंत्र्यांनी स्वत: माझ्या आईसोबत चर्चा करून मला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. मी बरी होईन, असा ‌विश्वास त्यांनी मला दिला. 
 

बातम्या आणखी आहेत...