आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus In India: India China Coronavirus Latest News And Updates; First Case Found In China Indian Woman

भारतीय शिक्षिका चीनच्या शेनझेन प्रांतात 2 आठवड्यांपासून व्हेंटिलेटरवर, कोरोनाव्हायरस पीडित पहिल्याच भारतीय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू / शेनझेन - चीनमध्ये भारतीय कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या पहिल्या भारतीयाचे नाव समोर आले आहे. भारतीय शिक्षिका प्रिती माहेश्वरी गेल्या दोन आठवड्यांपासून गुआंगडोंग प्रांतातील शेनझेन येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेनझेन येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजीमध्ये त्या शिक्षिका आहेत. 11 जानेवारी रोजी त्यांना श्वास घेण्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना कोरोनाव्हायरस न्युमोनिया टाइप-1 संक्रमण झाल्याचे जाहीर केले. मल्टीपल ऑर्गन फेल्युरमुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

क्राउडफंडिंगच्या माध्यमातून गोळा केले 29 लाख रुपये


प्रिती यांना सध्या शेकोऊ नावाच्या एका रुग्णालयातील विशेष वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. रक्तशुद्धीकरणासाठी डायलेसिस सुद्धा केले जात आहे. प्रितीचे भाऊ मनिष थापा यांनी ट्विटवर लिहिले, की "प्रितीच्या उपचारासाठी खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयात दाखल केले तेव्हापासून आतापर्यंत 10 लाख युआन अर्थात जवळपास 1 कोटी रुपयांचा खर्च आला आहे." मनिषने प्रितीच्या उपचारासाठी ऑनलाइन क्राउडफंडिंग उभी केली. खासगी संस्थांकडून त्यांना आतापर्यंत जवळपास 29 लाख रुपयांची मदत मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...