आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हायरसवर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची बैठक! आयपीएलच्या तिकीट विक्रीवर लगाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरस आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. त्यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव कसा रोखता येईल यावर चर्चा करण्यात आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीपूर्वीच मंत्रिमंडळात एक प्रस्ताव मांडला. त्यामध्ये गर्दी टाळण्यासाठी इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल सामने पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावानंतर मंत्रिमंडळाने तूर्तास आयपीएलच्या तिकीट विक्रीवर लगाम लावण्यात आला.

विधान भवनमध्ये दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची बैठक संपली. यामध्ये गर्दीचे कार्यक्रम आणि समारंभ टाळण्यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. लग्न समारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रम कसे टाळता येतील यावर देखील निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 5 रुग्ण सापडले आहेत. दुबईहून आलेल्या पुण्यातील एका पुरुष आणि एका महिलेचे सॅम्पल तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. या दोघांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर मंगळवारी त्यांच्या मुलीला आणि ड्रायव्हरला सुद्धा या रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील माहिती जारी केली. याच कुटुंबियांसोबत प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वच रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन रुग्णालय प्रशासनासह राज्य सरकारच्या वतीने केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...