आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने आग्र्यातील 6 जणांना लागण, देशात आतापर्यंत 12 केसेस; मोदी म्हणाले- 'घाबरु नका, आम्ही याप्रकरणात लक्ष देत आहोत'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील 70 देशांमध्ये पोहचला कोरोना, मृतांचा आकडा 3,113 वर तर 90,900 जणांना कोरोनाची लागण
  • दिल्ली आणि तेलंगाणामध्ये सोमवारी एक-एक जणाला संक्रमण झाल्याची पुष्टी, केरळमध्ये तीन रुग्ण

नवी दिल्ली- देशात कोरोना व्हायरसचे 12 रुग्ण असल्याची पुष्टि झाली आहे. यात आग्र्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे, जे दिल्लीतील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आले होते. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह म्हणाले की, “राज्यात आतापर्यंत सहा पॉजिटिव्ह केसेस आढळले आहेत. हे सर्वजण आग्र्यातील आहेत. रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्लीतील सफदरजंग हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. आम्ही सध्या विमानतळ आणि नेपाळच्या सीमाभागात लक्ष देत आहोत. अफवांवर विश्वास ठेवू नका. 


दुसरीकडे इटलीवरुन आलेल्या 69 वर्षीय रुग्णाला कोराना झाल्याची पुष्टी एसएमएस हॉस्पिटलचे डॉक्टर सुधीर भंडारी यांनी केली आहे. सध्या त्या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटल दिल्लीमधील इटली दूतावासाच्या संपर्कात आहे. या व्यक्तीसोबत इटलीमधील 18 जण भारत दौऱ्यावर आले होते.


तेलंगाणा आणि दिल्लीमध्ये सोमवारी एक-एक रुग्ण आढळले आहेत. सध्या त्या दोघांचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. यापूर्वी केरळमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. तेलंगाणा सरकार कोरोना पीडित रुग्णासोबत ज्या 25 जणांनी बस प्रवास केला होता, त्यांचीही तपासणी करत आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, घाबरण्याची गरज नाहीये. यासाठी चांगल्या पद्धतीचे उपचार केले जातील.

कोरोना व्हायरसबद्दल केजरीवालांनी मोदींशी चर्चा केली


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना व्हायरसबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली आहे. ते म्हणाले की, हा खूप भयंकर आजार आहे, त्यामुळे याविरोधात लढण्यासाठी योग्य ती पाऊले उचलली जातील. या चर्चेनंतर मोदींनी ट्वीट केले की- कोविड-19 बाबत मी खूप विचार केला आहे. बाहेरील देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची स्क्रीनिंग आणि तात्काळ उपचारासाठी केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकार सोबत मिळून काम करतील. याबाबत
घाबरण्याची गरज नाहीये.

परराष्ट्र मंत्रालयाने व्हिसाबाबत अॅडवायजरी जारी केली

कोरोना व्हायरस संक्रमण थांबवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने व्हिसाबाबत एक अॅडवायजरी जारी केली आहे. याअंतर्ग 3 मार्चपूर्वी इटली, इपाण, दक्षिण कोरिया आणि जापानच्या नागरिकांना जारी केलेले व्हिसा आणि ई-व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यादरम्यान, भारत-तिब्बेत सीमा पोलिस (आयबीपी) ने सांगितले की, त्यांच्या छावला स्थित केंद्रात ठेवलेल्या 112 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे.