आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली-अमेरिकेपेक्षा भारत बरा; ३० दिवसांत ३ वरून फक्त १०८ रुग्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतांच्या वारसांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा मागे
  • राष्ट्रीयऐवजी अधिसूचित आपत्ती का? येथे जाणून घ्या

नवी दिल्ली - केंद्राने कोरोनाला अधिसूचित आपत्ती घोषित केले आहे. यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांच्या भरपाईची घोषणा सरकारने आधी केली होती. मात्र ५२ मिनिटांतच ती मागे घेतली. राज्य आपत्ती मदत निधीतून मदत घेण्याबाबत केंद्राने राज्य सरकारांना पत्र लिहिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०८ वर गेला. १० जण बरे झाले. काेरोनाच्या मुकाबल्याबाबत भारत अमेरिका, चीन, इटली आणि द. कोरियापेक्षा बरा आहे.  १५ फेब्रुवारीला भारतात ३ रुग्ण, अमेरिकेत १५ व इटलीत ३ होते. महिनाभरात भारतात १०५ रुग्ण वाढले, दोन मृत्यू झाले. इटलीत १,४४१ तर अमेरिकेत ५० जणांचा बळी गेला.राष्ट्रीयऐवजी अधिसूचित आपत्ती का? :


एसडीआरएफच्या गाइडलाइन्समध्ये १२ प्रकारच्या राष्ट्रीय आपत्तींचा उल्लेख आहे. वादळ, दुष्काळ, आग, पूर, सुनामी, गारपीट, भूस्खलन आदींचा त्यात समावेश आहे. मात्र यात महामारीचा उल्लेख नाही. यामुळे कोरोनाला स्वतंत्रपणे अधिसूचित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...