आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus India Italy | Coronavirus Latest Updates On Coronavirus News Cases Deaths Italy Iran Japan Singapore

14 देशांमध्ये 3286 जणांचा मृत्यू, एकूण 95,488 रुग्णांपैकी 57,975 रुग्णांवर उपचार यशस्वी!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क / बीजिंग / रोम - कोरोना व्हायरस आता 80 देशांपर्यंत पोहोचला आहे. त्यातील 15 देशांमध्ये या रोगातून मृत्यूच्या नोंदी झाल्या आहेत. त्यातील 14 देशांमध्ये 3,286 जणांचा मृत्यू झाला. यातील जवळपास 3 हजार लोक एकट्या चीनमधून होते. जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत या रोगाची 95,488 लोकांना लागण झाल्याची औपचारिक माहिती दिली. तर वर्ल्ड मीटर डॉटइन्फोच्या आकडेवारीनुसार, त्यापैकी 57 हजार 975 लोक बरे सुद्धा झाले आहेत. कोरोना व्हायरस आता जागतिक रोगराई बनले आहे. चीननंतर आता दक्षिण कोरिया, इटली, जपान आणि इराणमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अमेरिकेने तर या देशांमध्ये प्रवास न करण्याच्या सूचना आपल्या नागरिकांना दिल्या आहेत.

जगभरात असा आहे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव

देशसंक्रमणमृत्यू
चीन804093012
दक्षिण कोरिया576635
इटली3089107
इराण292292
जपान10368
अमेरिका15911
फ्रान्स2854
स्पेन2222
हाँगकाँग1052
इराक352
ऑस्ट्रेलिया481
थायलंड431
तैवान421
सॅन मरिनो161
फिलिपाइन्स31
ब्रिटन510
भारत290
अल्जेरिया120
पाकिस्तान50
ब्राझील40
रशिया30
इजिप्त20

सोर्स: न्यूयॉर्क टाइम्स