आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CoronaVirus: Infected Person From Italy Went To A Children's Birthday Party In Noida, 2 School Holidays For Fear Of Infection

इटलीवरुन आलेला व्हायरस संक्रमित व्यक्ती नोएडामध्ये मुलांच्या बर्थ-डे पार्टीत गेला होता, संक्रमणाच्या भीतीने 2 शाळांनी दिल्या सुट्ट्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • शाळा प्रशासनाने सांगितले- बोर्ड परिक्षेवर याचा काही परिणाम होणार नाही, बिल्डिंगच्या सॅनिटायझेशनचे काम सुरू आहे

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसचे संक्रमण पसरण्यापासून थांबवण्यासाठी नोएडामधील शांळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यापैकी एका शाळेला 4 ते 6 मार्चदरम्यान तर दुसऱ्या शाळेला 9 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येईल. सोमवारी दिल्लीमध्ये इटलीवरुन आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.


मागच्या आठवड्यात तो व्यक्ती मुलांच्या बर्थडे पार्टीत गेला होता, तिथे त्या व्यक्तीचे मुलंदेखील होते. त्या व्यक्तीचे मुलं ज्या शाळेत शिकतात, त्या शाळेलाही बंद करण्यात आले आहे. सध्या शाळेत मंगळवारपासून होणाऱ्या परिक्षेला पुढे ढकलण्यात आले आहे. पण, शाळेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बोर्डाच्या परिक्षेवर याचा काही परिणाम होणार नाही. सध्या शाळेत सॅनिटायझेशनचे काम सुरू आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे 13 रुग्ण आढळले आहेत.


नोएडाचे डीएम बीएन सिंह यांनी सांगितले की, ‘‘इटलीवरुन आलेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. त्यांचा एक मुलगा नोएडमधील एका शाळेत शिकतो. तो बर्थडे पार्टीत काही मुलांनाही भेटला. आमची टीम याप्रकरणावर लक्ष घालून आहे. त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सध्या वेगवेगळं ठेवण्यात आले आहे. चिंता करण्याचे काही कारण नाहीये, आम्ही त्यांचे सँपल्स तपासणीसाठी दिले आहेत. त्याच्या रिपोर्ट आल्यावर पुढील योग्य ती काळजी घेतली जाईल.’’

शाळेच्या इमारतीमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले

गौतम बुद्ध नगर (नोएडा) चे सीएमओ डॉ. अनुराग भार्गवने सांगितले की, ‘‘विभागाला माहिती मिळताच, आम्ही एक टीम शाळेत पाठवली आहे. शाळेच्या इमारतीची चांगल्याप्रकरे सफाई झाली आहे. काही मुलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.’’
 

बातम्या आणखी आहेत...