आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या 330 जणांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान मायदेशी परतले आहे. या विमानात 323 भारतीय आणि 7 मालदीवचे नागरिक आहेत. मालदीव परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी सांगितले की, आमचे नागरिकदेखील काही दिवसांसाठी दिल्लीतील कँपमध्ये देखरेखीत ठेवण्यात येतील. दुसरीकडे, केरळमध्ये आज कोरोनाव्हायरसचे दुसरे प्रकरण समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, तरुण काही दिवसांपूर्वी चीनवरुन परतला होता. त्याला आइसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी 30 जानेवारीला केरळमध्ये पहिल्या रुग्णाची माहिती मिळाली होती.
केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा म्हणाल्या की, पीडित तरुणाला अलापुझा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमध्ये ठेवले आहे. आतापर्यंत आम्हाला नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वाइरोलॉजीतून त्याचे रिपोर्ट आले नाहीत. तो कोरोनाव्हयरसने ग्रासलेला असल्याचा संशय आहे. रिपोर्ट मिळाल्यानंतर याची पुष्टी होईल. कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या चीनच्या वुहानमधून 324 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विशेष विमान दिल्लीत पोहोचले. यात 211 विद्यार्थी आणि 110 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ते दुसऱ्यांच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून त्यांना पुढील 14 दिवसांपर्यंत मानेसर छावला कॅम्पमध्ये ठेवले जाईल. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून असेल.
यासोबतच आयटीबीपीने संक्रमित भारतीय रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी दिल्लीत ६०० खाटांचे वेगळे केंद्र स्थापले आहे. दरम्यान, राममनोहर लोहिया रुग्णालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे मरणाऱ्यांची संख्या 304 झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.