आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली/कोलकाता/बंगळुरू- केरळमध्ये आज(सोमवार) जीवघेण्या कोरोना व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, पीडित विद्यार्थी चीनमधील वुहान शहरात शिक्षण घेत होता. सध्या त्याला कासरगोड जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये ठेवले आहे. यापूर्वी 30 जानेवारी आणि 2 फेर्बुवारीला वुहान शहरातून परत आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले आहे. त्या दोघांचावर त्रिशूर आणि अलाप्पुझाच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच, केरळमध्ये 1793 जणांना आपल्या घरातच डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 362 जणांचा मृत्यू झाला आहे तर सर्वात जास्त मृत्यू चीनमधील हुबेई प्रांतात झाले आहेत.
तिकडे पश्चिम बंगाल सरकारने चीनच्या वुहानवरुन 23 जानेवारीला परतलेल्या 8 जणांची ओळख पटवली आहे, जे विमानात कोरोनाव्हायरसने संक्रमित केरळच्या विद्यार्थ्यांसोबत बसले होते. या आठ जणांमध्ये 3 पश्चिम बंगाल, 3 चीन आणि 1-1 ओडिसा आणि दिल्लीचे आहेत. चीनचे प्रवासी आपल्या देशात परतले आहेत. 5 भारतीयांना आरोग्य विभागाने सांगितेल्या सर्व अटी शर्तींचे पालन करण्यास सांगितले आहे.
चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत चीनमध्ये 17,222 प्रकरणे समोर आली आहेत. स्पुतनिक न्यूज एजेंसीने सांगितल्यानुसार, रशियाच्या रेल्वेने रविवारीपासून चीनला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द केल्या आहेत.
हॉन्गकॉन्गमध्ये चीनसोबत असलेली सीमा बंद करण्याची मागणी
हॉन्गकॉन्गच्या हॉस्पीटलचे शेकडो कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन करत काम बंद केले. त्यांनी कोरोना व्हायरसमुळे चीनला लागलेली सीमा बंद करण्याची मागणी केली. हॉन्गकॉन्गने चीनला जाणारी रेल्वे आणि जहाज सेवा आधीच रद्द केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीमा पूर्णपणे बंद करणे हे आंतराष्ट्रीय नियमानुसार बरोबर नाही. पण, कोरोनाचे संक्रमण रोखण्याचे योग्य ते सर्व उपाय केले जातील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.