• Home
  • Tech auto
  • Tech
  • Coronavirus| Protection from Coronavirus by Cleaning and Washing Hands TO Mobile Phone Device

कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी दर केवळ हातच नव्हे, मोबाईल सुद्धा ठेवा स्वच्छ

  • दर 90 मिनिटांनी साफ करा स्मार्टफोन, स्क्रीनवर असतात टायलेटपेक्षा अधिक जंतू

दिव्य मराठी वेब टीम

Mar 16,2020 09:37:51 PM IST

टेक डेस्क - कोरोना (कोविड-19) ने जगभरात आतापर्यंत 4500 पेक्षा अधिक लोकांचा जीव घेतला असून आकडा झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ने सुद्धा कोरोना व्हायरसला महामारी घोषित केले. संक्रमणापासून विविध आरोग्य संस्था संघटनांकडून वेळोवेळी निर्देश जारी केले जात आहेत. त्यामध्ये प्रत्येकाने पुन्हा-पुन्हा हात धूत राहाण्याचा सल्ला दिला. पण, काही डॉक्टरांनी नागरिकांना आपले स्मार्टफोन सुद्धा स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. केवळ स्मार्टफोनच नव्हे, तर आपण बाळगत असलेले गॅजेट सुद्धा वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे.


कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्याचा एक्सपर्ट टिप्स...

फरीदाबादच्या फोर्टिस एस्कॉर्ट्स रुग्णालयाचे एचओडी रवी शेखर झा यांनी सांगितल्याप्रमाणे, हात वारंवार धूत असताना स्मार्टफोन सुद्धा स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. कोरोनाच्या संक्रमाणापासून सुरक्षित राहण्यासाठी दर 90 मिनिटाला स्पिरिट किंवा हँड सॅनिटायझरने आपले स्मार्टफोन स्वच्छ करा. झा सांगतात, की डोळे, चेहरा, नाक यांना स्पर्श करू नका. तर फोन वारंवार स्पर्श करण्यापासून वाचण्यासाठी ब्लूटुथचा वापर करू शकता. किमान दिवसातून दोनदा फोन आवश्य स्वच्छ करा.


2018 मध्ये आलेल्या गॅजेट इंश्योरन्स प्रोव्हायडर इंश्योरन्स2गो ने एक धक्कादायक अहवाल सादर केला होता. त्यानुसार, स्मार्टफोनच्या स्क्रीनवर टॉयलेट सीटच्या तुलनेत तीन पट अधिक जंतू असतात. संशोधनात समोर आले होते की 20 पैकी एका स्मार्टफोन यूजरने आपला फोन 6 महिन्यांतून एकदाच स्वच्छ केला आहे.


श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इंस्टीट्यूट (नवी दिल्ली) च्या ज्योती मुत्ता, सीनिअर कंसल्टंट, मायक्रोबायोलॉजी यांनी सांगितले, कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने मोबाईल स्वच्छ करावा. यासाठी फोनच्या स्क्रीनवर एक थेंब सॅनिटायझर टाका आणि कॉटन पॅडने ते साफ करून घ्या. ऑफिसपासून घरी येत असताना आणि घरातून ऑफिसला जाताना सुद्धा मोबाईल स्वच्छ करावा. कोरोनाच नव्हे, तर सामान्य वेळी सुद्धा स्मार्टफोन स्वच्छ ठेवायला हवा. श्वास संबंधी आजार असलेल्या किंवा सर्दी खोकला झालेल्या व्यक्तींचे स्मार्टफोन वापरणे टाळावे.


अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ सरेच्या एका अभ्यासानुसार, स्मार्टफोनच्या होम बटनवर शेकडो बॅक्टेरिया असतात. यातील काही आरोग्याला खूप हानिकारक ठरू शकतात.


इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल (नवी दिल्ली) च्या सीनिअर कंसल्टंट सुरनजीत चॅटर्जी यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोनापासून वाचण्यासाठी आपले हात वारंवार धूत राहा. तसेच शिंकताना आपले तोंड आवश्य झाकावे. कोरोना व्हायरससह इतर जंतू ग्लास, मेटल आणि फोनच्या स्क्रीनवर सुद्धा जीवित राहता. त्यामुळे, हात वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ ठेवा.


डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, कोरोनाच्या विळख्यात कुठल्याही वयोगटातील व्यक्ती सापडू शकते. तरीही वयोवृद्ध आणि आजारी लोकांना याचा अधिक धोका आहे. संघटनेने लोकांना व्यवस्थित शिजलेले जेवण करणे आणि कुठेही न थुंकण्याचा सल्ला दिला आहे.

X