आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - पुण्यात आतापर्यंत 10 कोरोना व्हायसरचे प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 3 प्रकरणे पिंपरी चिंचवड येथील आहे. या सर्वांचा नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहे. या दरम्यान पिंपरीत एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. मलेशियात फिरण्यासाठी गेलेले येथील एक कुटुंब लवकरच परतणार आहे. यादरम्यान ते कुटुंब राहत असलेल्या सोसायटीतील लोकांनी त्या कुटुंबाला सोसायटीत प्रवेश न देण्याचे फर्मान काढले आहे. याबाबत पोलिसांनी कुटुंबाच्या वतीने तक्रार दाखल केली आहे.
फ्लोर सोसायटीतर्फे हे अजब फर्मान जारी करण्यात आले आहे. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सांगवी पोलिस ठाण्याचे एक पथक शुक्रवारी सोसायटीत गेले आणि तेथील लोकांना समजावले. या प्रकरणाचा तपास करणारे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले की, तुम्ही घाबरू नका आणि कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका असे आम्ही सोसाटीतील लोकांना सांगितले आहे. कायद्यानुसार, कोणीही कोणाला आपल्या घरात जाण्यापासून थांबवू शकत नाही.
आयसोलेशन वार्डात ठेवले जाऊ शकते
साबळे यांनी सांगितले की, याप्रकरणावर पोलिसांचे लक्ष आहे. सदरील कुटुंब सोमवारी पुण्यात परतणार आहे. जर त्यांना रोखण्यात आले तर असे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. दरम्यान कुटुंबातील लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसो अथवा न दिसो पण त्यांना 14 दिवसांसाठी आयसोलेशन वार्डात निरीक्षणाखाली ठेवले जाऊ शकते. जर त्यांची प्रकृती ठीक असेल तर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.