आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Scare Many Events Scheduled In India Have Been Cancelled Or Postponed

पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाची अनुपस्थिती, भारतातील अनेक इव्हेंट रद्द झाले किंवा पुढे ढकलण्यात आले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

  1. बॉलिवूड डेस्कः कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. अहवालानुसार जगभरात 89 हजाराहून अधिक संक्रमित लोक आढळले आहेत. तर भारतातही 28 रुग्ण असल्याचे समोर आले आहे. यात दिल्लीचा एक नागरिक, 6 आग्रा आणि एक तेलंगानाच्या नागरिकाचा समावेश आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर, देशातील बरेच मोठे इव्हेंट रद्द करण्यात आले किंवा ते लांबणीवर टाकण्यात आले आहेत.

दीपिका पदुकोणची पॅरिस फॅशन वीकला अनुपस्थिती

अलीकडे (12 फेब्रुवारी ते 3 मार्च) झालेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये लक्स ब्रँडच्या वतीने दीपिका पदुकोणला आमंत्रित केले गेले होते. परंतु कोरोना व्हायरसविषयी सावध राहून तिने या कार्यक्रमाला गैरहजर राहणे पसंत केले.  

आर अँड बी गायक खालिदचा भारत दौरा लांबणीवर

अमेरिकन आय अँड बी गायक खालिद एप्रिलमध्ये मुंबई आणि बेंगलुरूमध्ये शो सादर होणार होता. परंतु बर्‍याच आशियाई देशांमधील अलीकडील एडव्हाइजरीज आणि  ट्रॅव्हल रिस्ट्रक्शन्समुळे त्याने आपला भारतासह आशिया दौरा लांबणीवर टाकला आहे. “आम्ही मैफलीच्या नवीन तारखांवर सक्रियपणे काम करत आहोत,” असे त्याने एका निवेदनात म्हटले आहे.

रॉक बँड ग्रीन डे चा आशिया दौरा पुढे ढकलला

गेल्या शुक्रवारी ग्रॅमी पुरस्कारप्राप्त अमेरिकन रॉक बँड ग्रीन डे यांनी एका अधिकृत निवेदनात, खंत व्यक्त करुन सांगितले की, त्यांनी आपला आशिया दौरा पुढे ढकलला आहे.  ते म्हणाले होते की, "दुर्दैवाने कोरोना व्हायरसमुळे आपले आरोग्य लक्षात घेत आम्हाला आशियातील कार्यक्रमांना पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे."

अहाना कुमरा नाटकाच्या प्रयोगाबद्दल साशंक

या महिन्यात मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये अभिनेत्री अहाना कुमराचे  'देख बहन' हे नाटकहोणार आहे.  परंतु याबद्दल ती साशंका आहे. एका बातचीतमध्ये ती म्हणाली की, "याबद्दल काही बोलणे फार घाईचे होईल. आमचे नाटक रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे आणि हे पाहण्यासाठी किती लोक येतील हे मला माहिती नाही. ते पहाणे हे निर्मात्यांचे काम आहे."

वरुण-नताशा लग्नाची जागा बदलतील का?

मे महिन्यात वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल थायलंडमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे वृत्त आहे. परंतु आता हे दोघेही लग्नाचे ठिकाण बदलण्याच्या विचारात असल्याचे समजते. 

दिल्ली-जयपूरमध्ये शूटिंगची अनेक वेळापत्रकं रद्द झाली

येत्या काही दिवसांत दिल्लीत शूटिंग होणार नाही, असे लाइन प्रोड्युसर्स आणि पोलिस सूत्रांच्या हवाल्याने अहवाल देण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक वेळापत्रक रद्द केले गेले आहे. लाइन प्रोड्युसर तरुण के. जैन संभाषणात म्हणाले की, फ्रेंच संघाला जयपूर येथे त्यांचा एक वेब शो शूट करायचा होता, परंतु त्यांना त्यांची योजना रद्द करावी लागली. कोरोनाच्या भीतीमुळे यापूर्वीही चित्रपटांचे शूटिंग वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, कमल हसन यांच्या 'इंडियन 2' चे चीनचे वेळापत्रक मागील महिन्यात इटलीमध्ये हलविण्यात आले होते. शोभिता धुलीपला स्टारर 'सितारा'चे केरळ वेळापत्रक रद्द करण्यात आला.

'गुड न्यूज' हाँगकाँगमध्ये रिलीज होऊ शकणार नाही

व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "चीन आणि हाँगकाँगमधील चित्रपट महोत्सव, प्रदर्शन, निर्मिती आणि प्रमुख रिलीझ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले आहेत. अक्षय कुमार आणि करीना कपूर अभिनीत 'गुड न्यूज' 14 फेब्रुवारीला हाँगकाँगमध्ये रिलीज होणार होता. पण आता ऐकिवात आहे की, त्याचे प्रदर्शनही पुढे ढकलले गेले आहे. आर्थिकदृष्ट्या त्याचे नुकसान होणार नाही, कारण 2020 च्या सुरुवातीला एकाही मोठ्या भारतीय रिलीजचे नियोजन नव्हते."

लोक दिल्लीतील थिएटरमध्ये जाणे टाळतील

एका रिपोर्टनुसार, दिल्लीतील चित्रपट वितरक जोगिंदर महाजन म्हणतात की, गेल्या काही महिन्यांतील राजकीय आणि जातीय घडामोडींमुळे दिल्लीतील चित्रपटांचे कलेक्शन कमी राहिले. आता कोरोनाची भीती लोकांना थिएटरमध्ये जाण्यापासून प्रतिबंधित करते. गर्दीच्या भागापासून लोकांना दूर ठेवण्याच्या सल्ल्याचे सांगून जोगिंदर म्हणाले, "जोखीम घ्यायची कोणाला आवडेल? लोक थोड्या काळासाठी थिएटरमध्ये जाणे कमी करू शकतात."

बातम्या आणखी आहेत...