आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Schools Shut: Delhi Government Shuts Schools, Bans Biometric System In Govt Offices

दिल्लीतील सर्वच प्राथमिक शाळांना सुट्ट्या जाहीर! सरकारी कार्यालयांमध्ये बायोमॅट्रिक हजेरी बंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा राजधानीत फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले आहे. आदेशानुसार, 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील. यासोबतच, दिल्ली सरकारच्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बायोमॅट्रिक हजेरीवर सुद्धा बंदी लावण्यात आली आहे. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला ब्रुसेल्स दौरा रद्द केला. मोदी त्या ठिकाणी होणाऱ्या युरोपियन राष्ट्र आणि भारताच्या शिखर संमेलनात सहभागी होणार होते. दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या 30 झाली आहे. आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत गुरुवारी ही माहिती दिली. सोबतच, परदेशातून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी 21 विमानतळ आणि 12 बंदरांवर स्क्रीनिंग केली जात आहे.

राहुल गांधींचा सरकारला टोला

काँग्रेस नेते राहुल गांधींनी कोरोना व्हायरस सरकारच्या कामकाजाची खिल्ली उडवली. राहुल गांधी ट्विट करताना म्हणाले, "आरोग्य मंत्री सांगत आहेत की परिस्थिती नियंत्रणात आहे. ऐकून असे वाटते जसे टायटॅनिक जहाजाचा कॅप्टन प्रवाशांना सागतोय की जहाज बुडणार नाही. कोरोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी सरकारला ताकदीने प्रयत्न करायला हवे."

ग्रामीण भागांसाठी हेल्पलाइन जारी करा -काँग्रेस

आरोग्य मंत्र्यांनी राज्यसभेनंतर लोकसभेत सुद्धा कोरोना संदर्भात माहिती जारी केली. यानंतर काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ग्रामीण भागांमध्ये सुद्धा सुविधा देण्यात याव्या अशी मागणी केली. देशभरातील विमानतळांवर स्क्रीनिंग केली जात आहे. परंतु, ग्रामीण भागांचे काय? त्यांच्यासाठी एक हेल्पलाइन सुरू करा. जेणेकरून गावात एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास ते वेळीच मदत मागवू शकतील. किमान लहान मुलांचा विचार करून ग्रामीण भागांत उपाययोजना करा असे आवाहन चौधरी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...