आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या तिघांवर ‘वाॅच’: दुबईहून परभणीत आलेल्या ५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - दुबईला पर्यटनासाठी जाऊन आल्यानंतर पुण्यातील एका कुटुंबातील तिघांसह त्यांचा वाहनचालक कोरोनाने बाधित झाले आहेत. दुबईहून ज्या विमानाने पुण्याचे प्रवासी आले होते त्या विमानात असलेल्या महाराष्ट्रातील सर्व सहप्रवाशांवर आरोग्य विभागाकडून वॉच ठेवला जात आहे. यात बीडमधील तीन जणांचा समावेश आहे. दरम्यान, या तिघांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, त्यांना कोणताही त्रास होत नाही. मात्र २९ मार्चपर्यंत दरराेज त्यांच्या आरोग्याबाबत माहिती   राज्य स्तरावर कळवली जाणार आहे.राज्यातील काही नागरिक पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. १ मार्च रोजी सर्व जण विमानाने मुंबईत आले. दरम्यान, यापैकी पुण्याच्या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबईहून पुण्याला ज्या वाहनाने ते आले त्या वाहनचालकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. यानंतर आरोग्य विभागाने त्या विमानाने आलेल्या सर्वच नागरिकांची यादी मिळवून ज्या जिल्ह्यातील हे लोक आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवून या नागरिकांच्या प्रकृतीबाबत चौकशी सुरु केली आहे. बीड शहरातील सहयोगनगर भागातील रहिवासी पती, पत्नी आणि त्यांचा छोटा मुलगा याचा समावेश आहे. हे तिघेही याच विमानातून १ मार्च रोजी दुबईहून परत आले होते.  आरोग्य विभागाने या दांपत्याला संपर्क करुन तिघांची प्रकृती ठणठणीत

या तिघांचीही प्रकृती ठणठणीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात अद्याप एकही संशयित रुग्ण नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. 

 - डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीडदुबईहून आलेल्या ५ जणांचे नमुने तपासणीसाठी


परदेशातून आलेला एक जण निरीक्षणाखाली, कोरोनासंबंधित सॅम्पल पाठवले

परभणी - दुबईतून १ मार्च रोजी भारतात दाखल झालेल्या एका नागरिकाने स्वतःहून बुधवारी(दि.११) जिल्हा शासकीय रुग्णालय गाठल्यानंतर त्याचे स्वॅब नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत दुबईहून आलेल्या पाच व्यक्तींची प्राथमिक तपासणी करून त्यांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. साधारणतः ४५ वर्ष वयाची परभणीतील रहिवाशी असलेली ती व्यक्ती दुबई येथे गेली होती. दि.१ मार्च रोजी ते दुबईतून मुंबईत विमानाने दाखल झाले. परभणीत आल्यानंतर बुधवारी ते स्वतःहून कोरोना संबंधातील संभ्रम दुर करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र रुग्णालयात पुरेशी माहिती न मिळाल्याने त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बालासाहेब नागरगोजे यांच्या कक्षाकडे धाव घेतली. डॉ.नागरगोजे यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागरगोजे यांनी यास दुजोरा दिला. मात्र संबंधीत नागरिकांत कोरोना विषयक कोणतेही लक्षणे दिसून आली नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून नमुने घेऊन त्यांना उपचारासाठी नव्हे तर केवळ निरीक्षणासाठी महापालिकेच्या विशेष रुग्ण कक्षात ठेवण्यात आले आहे, असे डॉ.नागरगोजे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...