आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Cororna Virus | With The Increase Of Disease, NPAs Worth $ 1 Million Can Be Made In The World

साथरोग आणखी वाढल्यास जगात १.१ लाख कोटी डॉलरचे कर्ज एनपीए शक्य

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
 • कॉपी लिंक
 • भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर विषाणूचा नकारात्मक परिणाम तेज,
 • जागतिक बँकेकडून नुकसानीची शक्यता व्यक्त
 • ओयोने ५ हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली, चीनमध्ये सर्वात कपात होणार

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग चीनबाहेर जवळपास ७० देशांत पसरला आहे. यामुळे लहान-मोठ्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्था स्टँडर्ड  अँड प्युअर्सच्या अहवालानुसार विषाणूच्या संसर्गामुळे अनेक कंपन्या दबावात येतील. यामुळे जगभरात जवळपास १.१ लाख कोटी डॉलर(सुमारे ८० ला कोटी रुपये)चे कर्ज एनपीए होऊ शकते. तसे झाल्यास २००८ नंतर पुन्हा एकदा बँकिंग संकटात येऊ शकते.चीन एक मोठा निर्यातदार देश आहे. तेथून अनेक प्रकारची उत्पादने लहान-मोठ्या देशात पुरवठा होतात. विषाणूवर लवकर नियंत्रण न मिळवल्यास मॅन्युफॅक्चरिंग निर्यातीवर वाईट परिणाम होईल. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग निर्यातीत सुमारे ५ हजार कोटी डॉलरची मोठी घसरण नोंदली जाऊ शकतेे.दुसरीकडे, न्यूयॉर्क टाइमच्या एका अहवालात केलेल्या दाव्यानुसार, विषाणूमुळे अनेक लहानमोठे व्यवसाय संकटात येऊ शकतात. जिथे-जिथे विषाणूचा उद्रेक वाढत आहे, तेथील कर्मचाऱ्यांच्या सुट्या लांबत आहेत. यासोबत लोकांना घरात थांबण्याचा नाइलाज होत आहे. याशिवाय रेस्तराँ आणि एंटरटेनमेंटशी संबंधित व्यवसायावरही जास्त परिणाम होईल.भारताला २.५ हजार कोटींच्या नुकसानीची शक्यताः यूएन रिपोर्ट


संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, भारत अशा १५ देशांच्या यादीत समाविष्ट आहे, ज्यांच्या अर्थव्यवस्थांना कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. या विषाणूमुळे भारताला व्यापारात २.५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. युरोपीयन युनियनने यामुळे १.१ लाख कोटी रुपयाच्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली. हे भारतापेक्षा ४४ पट जास्त आहे.येत्या तीन महिन्यांसाठी औषधांचा पुरेसा पुरवठा

रसायन आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी गुरुवारी सांगितले की, सरकार कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. देशातील औषध आणि कच्च्या मालात घट येेणार नाही. गौडा म्हणाले, सध्या ही चिंतेची बाब नाही. येत्या तीन महिन्यांसाठी देशात औषधाच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या माला(एपीआय)ची कोणतीही कमतरता नाही. मंगळवारी सरकारने हा निर्णय पॅरासिटामोलसारख्या सामान्य औषधासह २५ अन्य एपीआय आणि औषधांच्या देशातील निर्यातीस बंदी घातली होती. सरकारने हा निर्णय देशात कोरोना विषाणूचे रुग्ण समाेर आल्यानंतर औषध टंचाई दूर करण्यासाठी घेतला होता.

दिलासा : चीनमध्ये वाहन कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू

कोरोनाच्या उद्रेकात भारतीय वाहन उद्योगासाठी एक चांगली बातमी आहे. चीनच्या कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू झाले असून आता लवकरच ऑटो कंपन्यांना सुट्या भागाचा पुरवठा होईल. एप्रिलच्या महिन्यात भारतात बीएस-६ मानक लागू होणार आहे. अशा स्थितीत कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. कोरोना संसर्गामुळे चीनच्या हुवावेमध्ये दीर्घावधीपासून सर्व कारखाने बंद केले होते. देशातील सर्वात मोठी पॅसेंजर कंपनी मारुतीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले, चीनमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे आमच्या उत्पादनावर परिणाम होत नाही, घाबरण्याची गरज नाही. वास्तावात हळूहळू स्थिती चांगली होत आहे.

 

हैदराबादेत आयटी पार्क; गुरगाव : पेटीएम बंद
 
कोरोना विषाणूचा परिणाम आता भारतीय कंपन्यांवरही होत आहे. पेमेंट सर्व्हिस देणारी कंपनी पेटीएमच्या गुरगाव येथील कार्यालयात एका कर्मचाऱ्यास कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह निदान झाले. कंपनीने सांगितले की, तो कर्मचारी नुकताच इटलीत सुट्या साजऱ्या करून परतला आहे. यामुळे पेटीएमने नोएडा स्थित आपले मुख्यालय आणि गुरगाव कार्यालय पुढील सूचनेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादचे रहेजा माइंडस्पेस टेक पार्कही रिकामे केले आहे. येथे अॅमेझॉन, फेसबुक, क्वॉलकॉम, आयबीएमसारख्या कंपन्यांची कार्यालये आहेत. या पार्कमध्ये डीएसएममधील एक कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आढळला.
 

विषाणूचा व्यावसायिक परिणाम वाहतूक, निर्यातीपासून बाजारपेठेपर्यंत
 

 • मॅन्युफॅक्चरिंग निर्यात: संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार, फेब्रुवारीत जगभरात मॅन्युफॅक्चरिंग निर्यातीत ५ हजार डॉलरची घसरण येऊ शकते.
 • तेलाची मागणी : २० पासून आतापर्यंत किमतीत २०% ची घसरण आली . ऊर्जा क्षेत्रात मार्च पुरवठ्यात सरासरी ३.५२ डॉलर प्रति एमएमबीटीयू अाहे. ५२% खाली.
 • सागरी व्यापार : २० जानेवारीनंतर पर्शियन गल्फ चीन व्हीएलसीसीमध्ये वाहतूक दर ५०% पर्यंत घसरला . चीनची एलएनजी आयात ६% पर्यंत कमी झाली.
 • कपात: हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील भारतीय कंपनी आेयोने कोरोना विषाणूमुळे जगात ५ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. सर्वात जास्त कपात चीनमध्ये होईल.
 • हवाई वाहतूक: इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्टेशन असोसिएशनच्या अहवालानुसार, कोरोना विषाणूमुळे एअरलाइन उद्योगाला २९०० कोटी डॉलरचे नुकसान होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...