आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या योजनेत मिळतेय बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज; आपणही करू शकता संधीचे सोने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या कॉर्पोोरेट एफडीवर 9 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. सरकारी बँका एफडीवर 7 टक्के व्याज देतात. परंतु, तुम्ही खासगी कंपन्यांच्या एफडीत गुंतवणूक करून याहून अधिक व्याज मिळवू शकता. रिझर्व बँकेने खासगी क्षेत्रातील कंपन्यांना मंजुरी दिल्यामुळे या कंपन्यांमध्ये एफडीत गुंतवणूक करणे सुरक्षित आहे.
 
कॉर्पोरेट एफडीवर 9 टक्केपर्यंत व्याज 
 
कंपनी आणि व्याज दर
महिंद्रा फायनान्स  - 8.10 ते 9 टक्के
श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स - 7.95 ते 8.88 टक्के
बजाज फायनान्स - 8 ते 8.75 टक्के 
पीएनबी एचएफएल - 8.30 ते 8.45 टक्के
सोर्स बँक बाजारडॉटकॉम 
 
सूचना - या व्याजदराचा कालावधी 1 ते 5 वर्षापार्यंत आहे. 
 
गुतंवणूक करण्यापूर्वी कंपनीची रेटींग तपासून घ्या 
कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करणे जोखमेचे असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी कंपनीचे क्रेडीट रेटिंग आणि त्यांच्या व्यवसायाचे रेकॉर्ड याबद्दल संपूर्ण माहिती तपासून घ्यावी.
 
काय अाहे कॉर्पोरेट एफडी  
खासगी कंपन्या एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूकदाराकडून जे पैसे घेतात त्याला कॉर्पोरेट एफडी म्हणतात. यासाठी या कंपन्या गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यासाठी सांगतात. गुंतवणूकदाराला आकर्षित करण्यासाठी या कंपन्या इतर बँक आणि फायनान्स कंपनीपेक्षा जास्त व्याजदर देतात. गुंतवणूक करण्याआधी या कंपन्यांना त्यांच्या नियमानूसार गुंतवणूकदाराकडून डिपॉझिट घेण्याचा अधिकार असतो. यामुळे कंपन्यांच्या कॉर्पोरेट एफडीवर जास्त व्याजदर असल्याने यात गुंतवणूक करणे फायद्याचे असते.
 
कॉर्पोरेट एफडीचा कालावधी
कॉर्पोरेट एफडीअंतर्गत या कंपन्यांनी घेतलेले डिपॉझिट परत करण्याचा कालावधी 6 महिन्यांपासून 36 महीन्यांपर्यंत असतो. या कालावधीपेक्षा जास्तकाळ डिपॉझिट घेण्याचा अधिकार या कंपन्यांना नसतो. तसेच गुंतवणूकदाराकडून डिपॉझिट घेण्यासाठी या कंपन्यांचे वार्षिक उत्पन्न 100 कोटी ते 500 कोटी असणे आवश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...