आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corporate | Reliance Industries Becomes India's First Rs 9 Lakh Crore Company By Market Cap

रिलायन्स इंडस्ट्रीज 9 लाख कोटींची मार्केट कॅप असणारी देशातील पहिली कंपनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीज ९ लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असणारी देशाची पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी २% वाढ झाली. या तेजीमुळे रिलायन्सचे मूल्यांकन वाढून ते ९.०१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मात्र, शेअर बाजार बंद झाल्यावर ते ८.९७ लाख कोटी रुपये राहिले. शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता कंपनीच्या शेअरची किंमत १,४२८ रुपये होती, अशा प्रकारे कंपनीचे मार्केट कॅप ९.०३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. रिलायन्स मागील वर्षी आॅगस्टमध्ये ८ लाख कोटी रुपयांच्या आकड्यावर पोहोचली होती. याबाबतही ती सर्वात पहिली कंपनी ठरली होती. मार्केट कॅपमध्ये टीसीएस ही आयटी कंपनी (मूल्यांकन ७.७० लाख कोटी रु.) दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजार बंद झाल्यानंतर दुसऱ्या तिमाहीचे निकाल घोषित केले, त्यात विक्रमी ११,२६२ कोटींचा नफा जाहीर करण्यात आला. रिलायन्स १० हजार कोटींचा तिमाही नफा कमावणारी देशातील पहिली खासगी कंपनीही आहे. या वर्षी कंपनीच्या शेअरने २६.२१% रिटर्न दिले आहे. ब्रोकरेज फर्म बँक आॅफ अमेरिका मेरिल लिंचने बुधवारी हा अहवाल जारी केला. त्यानुसार पुढील दोन वर्षांत रिलायन्स कंपनीचे मार्केट कॅप २०० अब्ज डाॅलरपर्यंत (१४.२० लाख कोटी) पोहोचू शकते. मला व्यवसायात रस कधीच नव्हता. वडिलांच्या सांगण्यावरून रिलायन्स इंडस्ट्रीजशी जोडला गेलो. मी कधी पैशांना महत्त्व दिले नाही. वडील नेहमी म्हणत असत की, जर तुम्ही पैशांच्या मागे धावाल, तर तुमच्यापेक्षा मूर्ख कोणी नाही. - मुकेश अंबानी, (अलीकडे दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीत)

मूल्यांकनाच्या बाबतीतील टॉप 5 कंपन्या

       कंपनी  मार्केट कैप (रुपये)   
रिलायन्स इंडस्ट्रीज   9 लाख कोटी
टीसीएस   7.70 लाख कोटी
एचडीएफसी बँक   6.71 लाख कोटी
हिंदुस्तान युनिलिव्हर    4.58 लाख कोटी
एचडीएफसी   3.59 लाख कोटी

रिलायन्सच्या शेअर्सने यावर्षी 27% परतावा दिला
रिलायन्स 10 हजार कोटींचा तिमाही नफा कमावणारी देशातील पहिली खासगी कंपनी देखील आहे. रिलायन्सला 2018 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत पहिल्यांदा इतका नफा मिळाला होता. जानेवारी तिमाहीचा निकाल घोषित केल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सचे चांगले प्रदर्शन सुरु आहे. शुक्रवारी या बढतीचा सलग पाचवा दिवस आहे. यावर्षी रिलायन्सच्या शेअर्सने 27% परतावा दिला आहे. 31 डिसेंबर 2018 रोजी बीएसई वर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 1121 रुपये होती. शेअरची किंमत आता 1428 रुपये झाली आहे. हा 52 आठवड्यातील उच्चांक आहे. 

रिलायन्सचे पाच विक्रम

ऑक्टोबर 2007100 अब्ज डॉलरचे मार्केट कॅप असणारी देशातील पहिली कंपनी बनली
जुलै 201811 वर्षांनंतर पुन्हा एकदा 100 अब्ज डॉलरचे मूल्यांकन प्राप्त केले.
ऑग्सट 20188 लाख कोटी रुपये मार्केट कैप असणारी देशातील पहिली कंपनी बनली.
जानेवारी 201910 हजार कोटी रुपयांचा तिमाही नफा असणारी देशातील पहिली खासगी कंपनी.
ऑक्टोबर 20199 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन असणारी देशातील पहिली कंपनी 

पुढील 2 वर्षांत रिलायन्स 200 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेलः अहवाल
ब्रोकरेज फर्म बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने बुधवारी हा अहवाल जारी केला. या अहवालानुसार रिलायन्सच्या नव्या वाणिज्य आणि ब्रॉडबँड व्यवसायाच्या मदतीने पुढील 24 महिन्यांत कंपनीचे बाजारमुल्या 200 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकेल.

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती 
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे वार्षिक उत्पन्न 55.3 अब्ज डॉलर (3.86 लाख कोटी रुपये) आहे. अंबानी गेल्या वर्षी चीनच्या अलीबाबाचे फाउंडर जॅक मा यांना मागे टाकत आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती बनले होते. जॅक मा यांचे वार्षिक उत्पन्न सध्या 41.7 अब्ज डॉरल (2.96 लाख कोटी रुपये) आहे. 

बातम्या आणखी आहेत...