Home | Maharashtra | Vidarva | Akola | corrupt Health Inspector of municipal corporation is in the trap of ACB

'मनपा'चा लाचखोर आरोग्य निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी | Update - Aug 28, 2018, 11:39 AM IST

वेतन काढण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याकडून १८०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आरोग्य निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग

  • corrupt Health Inspector of municipal corporation is in the trap of ACB

    अकोला- वेतन काढण्यासाठी सफाई कर्मचाऱ्याकडून १८०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आरोग्य निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या अधिकाऱ्यांनी पकडले. ही कारवाई सोमवारी सकाळी ८.४५ वाजता केली.


    मंगेश किसन बांगर (वय ३०कंत्राटी आरोग्य निरीक्षक वर्ग-३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारकर्ते यांची पत्नी महापालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून मंगेश बांगर यांच्या अधिपत्याखाली आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे जुलै महिन्यात कामावर ९ खाडे झाले. ते ९ खाडे नियमित करण्यासाठी प्रत्येकी एका खाड्याचे २००रुपये प्रमाणे एकूण १८०० रुपये लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा तक्रारदाराची नसल्याने त्यांनी अकोला एसीबीकडे २३ ऑगस्ट रोजी तक्रार केली. त्यावरून एसीबीने पडताळणी करून सोमवारी सकाळी सापळा लावला.


    या सापळ्यात मंगेश किसन बांगर याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून एसीबीने लाचेची रक्कम जप्त करून सिटी कोतवाली ठाण्यात आरोपी लोकसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण, पोकाँ. गजानन दामोदर, सुनील राऊत, राहूल इंगळे, सुनील ऐलोने व कैलास खडसे यांनी केली.

Trending