आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corrupt Workers And Officers Will Not Be Able To Leave The Country Any More, The Government Said Will Not Give Passports

आता देश सोडून पळू शकणार नाहीत भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकारी, सरकार म्हणाले - पासपोर्ट देणार नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेले अधिकारी व सरकारी कर्मचारी यापुढे देश सोडून पळू शकणार नाहीत. शुक्रवारी आलेल्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने पासपोर्ट जारी करण्याचे नियम कडक केले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एफआयआर दाखल होणे, तपासादरम्यान किंवा चार्जशीट दाखल झाल्यावर पासपोर्ट जारी केले जाणार नाही. याला पासपोर्ट जारी करण्याच्या गाइडलाइनमध्ये सामील केले गेले आहे. जर असे एखाद्या कर्मचारी किंवा ऑफिसरचे पासपोर्ट जारी केलेही असेल तरी त्याला सरकार रद्द करेल. इतर कोणत्या प्रकरणातही जर कुणाला कोर्टाच्यावतीने समन किंवा अटक वॉरंट जारी झाले असेल तर त्यालादेखील पासपोर्ट जारी केले जाणार नाही. 

कार्मिक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय मिळून काम करतील... 

भ्रष्ट ऑफिसर, कर्मचाऱ्याला कोणत्याच पद्धतीने पासपोर्ट जारी होऊ नये, म्हणून सेंट्रल व्हिजिलन्स कमीशनसोबत कार्मिक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय मिळून काम करेल. न्यूज एजन्सी पीटीआयच्या बातमीनुसार, सरकारी ऑफिसर किंवा कर्मचाऱ्याला विना व्हिजिलन्स क्लियरन्स रिपोर्टचे पासपोर्ट दिले जाणार नाही.  
 

उपचारासाठी जाऊ शकतील....  

मात्र, सरकारने अशी तरतूददेखील केली आहे, ज्याच्या अंतर्गत आरोपी ऑफिसर किंवा कर्मचारी चौकशीदरम्यान स्वतःच्या किंवा कुटुंबियांच्या उपचारासाठी परदेशी जाऊ शकतो, पण काही अटींच्या आधारेच.  

बातम्या आणखी आहेत...