आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corruption In The Judiciary? Patna High Court Judges Order Inquiry Into Corruption

न्यायपालिकेत भ्रष्टाचार ? न्यायाधीशांचा निकाल-उच्च न्यायालय भ्रष्ट न्यायाधीशांना वाचवत आहे, चौकशी व्हायला हवी : अकरा दिवसांत न्यायाधीशांचे बेंच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटणा  - पटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनंतर दुसरे वरिष्ठ न्यायमूर्ती राकेश कुमार यांनी न्यायपालिकेत भ्रष्टाचाराचा खुलासा करताच त्यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली.

राकेश कुमार यांनी बुधवारी म्हटले होते की, उच्च न्यायालय प्रशासन भ्रष्ट न्यायाधीशांना वाचवत आहे. ज्या न्यायाधीशांविरोधात भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे त्यांना बरखास्त करण्याएेवजी किरकोळ शिक्षा का करण्यात आली? उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांनी भ्रष्टाचारावरील माझा विरोध दुर्लक्षीत केला. न्या. राकेश कुमार माजी आयएएस अधिकारी के. पी. रमैया यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर सुनावणी करीत होते. या दरम्यान त्यांनी आपल्या आदेशात कडक नोंदी केल्या होत्या. त्यांनी न्यायालयात आधी झालेल्या स्टींग ऑपरेशनचे स्वत: माहिती घेत त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्याची चौकशी सीबीआयला सोपवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य न्यायाधीश ए.पी. शाही यांच्या अध्यक्षतेखाली ११ न्यायाधीशांच्या पीठ स्थापन झाले अाणि लगेच राकेश  कुमार यांनी दिलेल्या चौकशी आदेशाला स्थगिती देण्यात आली. न्या. राकेश यांनी आपल्या आदेशाची प्रत सीजेआय, सीबीआय, पीएमओ यांना पाठवून आदेश दिले होते की, ज्याला पीठाने रजिस्टरीला सांगून स्थगित केले होते. पीठाने सांगितले की, राकेश कुमार यांनी न्यायपालिकेलाच कलंकित केले आहे. त्यांना या प्रकरणात सुनावणी करण्याचा अधिकार नव्हता. यामुळे त्यांचा आदेशाला स्थगिती देण्यात आली. या निर्णयानंतर न्या. राकेश कुमारही शांत राहिले नाहीत. त्यांनी सांगितले की, ज्या न्यायाधीशांवर मी आरोप लावले होते, त्यातील अकरा न्यायाधीश पीठात अाहेत.
 

मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील बेंच  न्या. राकेश 
न्या. राकेश यांचा आदेश गल्लीच्या कोपऱ्यावरील वक्तव्यासारखा : बेंच 
११ न्यायमूर्तींच्या बेंचने म्हटले की, वृत्तपत्रांत  छापून आलेल्या न्या. राकेश यांच्या आदेशाबाबतच्या बातम्यांनी आम्ही चकित आहोत. त्यांच्या आदेशाने न्यायपालिकेची प्रतिष्ठा सर्वसामान्य लोकांच्या नजरेतून उतरली आहे. त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या  बाहेर जाऊन एका संपलेल्या खटल्यात आदेश पारित करून अनैतिक काम केले आहे. त्यांचा आदेश नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या विरुद्ध आणि पूर्वग्रहदूषित आहे. आरोप पाहून वाटते की, हा आदेश हायकोर्टाचा नसून गल्लीच्या कोपऱ्यावर केलेल्या वक्तव्यासारखा आहे.
 

कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराशी तडजोड करणार नाही : न्या. राकेश कुमार
न्या. राकेश यांनी गुुरुवारी म्हटले की, ‘भ्रष्टाचार उघड करणे गुन्हा मानला जात असेल तर हो, मी गुन्हा केला आहे. याचा मला काहीच पश्चात्ताप होत नाही.  योग्य वाटले तेच मी केले. मी आपल्या आदेशात ज्यांच्यावर आरोप केला, त्यांच्यापैकी काही जण मुख्. न्यायमूर्तींबरोबर बसून माझाच आदेश रद्द करण्यासाठी सुनावणी करता आहेत. मी माझ्या आदेशावर ठाम आहे आणि कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराशी तडजोड करणार नाही. मी आपली संवैधानिक जबाबदारी निभावली. कुणाबद्दलही माझ्या मनात वाईट भावना नाही.
 

वकील असताना न्या. राकेश यांनी लालूंना पाठवले होते जेलमध्ये
न्या. राकेश कुमार यांनी २६ वर्षे वकिली केली. ते केंद्र सरकार आणि बिहार सरकारचे  वकील होते. डिसेंबर २००९ मध्ये ते उच्च न्यायालयाचे अॅडिशनल जज बनले आणि दोन वर्षांनंतर ऑक्टोबर २०११ मध्ये कायम न्यायमूर्ती झाले. ते ३१ डिसेंबर २०२० ला निवृत्त होतील. न्या.  राकेश वकील असताना चारा घोटाळ्यात सीबीआयकडून खटला लढ‌त होते. याच घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांना जेलमध्येे जावे लागले, ते आता शिक्षा पूर्ण करत आहेत.