आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉसमॉस सायबर बँक घोटाळा : दीड लाख रुपयास दलालांना मिळाले ३० हजारांचे कमिशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काॅसमाॅस बँकेच्या पेमेंट सिस्टिमवर मालवेअर अॅटॅक हाेऊन बँकेच्या रूपी अाणि व्हिसा कार्ड तसेच स्विफ्ट सर्व्हर हॅक करून तब्बल ९४ काेटी ३२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात अाल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणी तपास करत असलेल्या पथकाने भिवंडी अाणि अाैरंगाबाद येथील दाेघांना अटक केली अाहे. चाैकशीदरम्यान या घटनेमागे अांतरराष्ट्रीय माेठी टाेळी सक्रिय असल्याचे उघडकीस अाले अाहे. याप्रकरणी बुधवारी गाेवा येथून तपास पथकाने अाणखी एकास अटक केली असून मुंबर्इतून संशयितास ताब्यात घेण्यात येणार अाहे. ताब्यात घेण्यात अालेल्या अाराेपींच्या चाैकशीदरम्यान विविध बँकेच्या एटीएममधून घटनेच्या दिवशी त्यांना बनावट क्लाेन कार्ड देण्यात अाले हाेते व त्याअाधारे माेठ्या प्रमाणात पैसे काढण्यास सांगण्यात अाले हाेते. याकामी प्रत्येक दीड लाख रुपयास ३० हजार रुपये कमिशन त्यांना मिळाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


दोन दिवसांपूर्वीच भिवंडी येथून अटक केलेला अाराेपी फहिम मेहफूज शेख हा फिल्पकार्ट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करताे, तर अाैरंगाबाद येथून अटक केलेला फहिम अझीम खान हा चालक म्हणून कार्यरत अाहे. काेल्हापूर येथील विविध एटीएममधून ८९ लाख ४७ हजार रुपये काढण्यात आले असून अाराेपींनी ११ अाॅगस्ट राेजी ९५ बनावट कार्डच्या अाधारे सुमारे १५ लाख रुपये काढले अाहेत. अाराेपींना एका व्यक्तीने माेठ्या प्रमाणात बनावट क्लाेन कार्ड घटनेच्या आधी अाणून दिले हाेते. त्यानुसार संबंधित ठिकाणी अाणि वेळेवर पैसे काढण्यास त्यांना सांगण्यात आले हाेते. पाेलिसांना तपासादरम्यान दाेन्ही अाराेपींची छायाचित्रे, वेळ अाणि तारीख काेल्हापुरातील एटीएममधील सीसीटीव्हीत सापडली आहेत. अशाच प्रकारे अाणखी पाच संशयित तपासात निष्पन्न झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथके तयार करून देशभरात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 


परदेशातील बँकांशी पत्रव्यवहार : ज्याेतिप्रिया सिंह 
सायबर गुन्हे शाखेच्या पाेलिस उपायुक्त ज्याेतिप्रिया सिंह म्हणाल्या, सुरुवातीच्या टप्प्यात देशातंर्गत रूपी कार्डद्वारे जे पैसे काढण्यात अालेले अाहेत त्यातील अाराेपींचा शोध घेण्यात येत असून तपासाबाबत भक्कम पुरावे मिळाले अाहेत. विविध बँकांशी समन्वय साधून सीसीटीव्ही फुटेज गाेळा करण्यात अाले असून या गुन्ह्यामागे माेठी टाेळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले अाहे. २८ देशांतून ७८ काेटी रुपये काढण्यात अाले असून स्विफ्ट सर्व्हर हॅक करून १३ काेटी रुपये मालवेअर अॅटॅकच्या माध्यमातून काढण्यात अालेले अाहे. याबाबत परदेशातील संबंधित बँकांशी पत्रव्यवहार सुरू असून अावश्यक माहिती गोळा करण्यात येत आहे. 


देशात तब्बल ४१३ डेबिट कार्डचा वापर 
काेल्हापूर, मुंबई, इंदूर, अजमेर येथूनही बनावट क्लाेन कार्डच्या माध्यमातून वेगवेगळया एटीएम मधून पैसे काढण्यात अाल्याचे तपासात निष्पन्न झाले अाहे. त्यानुसार पाेलिसांची पथके अाराेपींचा शाेध घेत अाहेत. देशातील विविध शहरांत एकूण ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून दाेन हजार ८०० व्यवहारांद्वारे दाेन काेटी ५० लाख रुपये लंपास करण्यात आले अाहेत. देशभरातील ७२ वेगवेगळया बँकेच्या एटीएमच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून सायबर गुन्हे शाखेने संबंधित बँकांना संपर्क करून सीसीटीव्ही फुटेज मागितले अाहे. बँकेच्या ग्राहकांच्या कार्ड डाटाची माहिती काेणी तरी हॅकरपर्यंत पाेहोचवलेली असून त्याअाधारे संगनमताने माेठा कट रचण्यात अाला अाहे. या फसवणुकीसाठी नेमके बनावट क्लाेन कार्ड कशा प्रकारे पुरवले गेले याबाबत पाेलिस तपास करत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...