Home | Maharashtra | North Maharashtra | Dhule | Councilor's husband threatens

नगरसेविकेच्या पतीला धमकी; खंडणीची मागणी :जुन्या धुळ्यातही प्रकार; मात्र नाेंद नाही

प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 11:59 AM IST

याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

 • Councilor's husband threatens

  धुळे - महानगरपालिका निवडणुकीला अद्याप प्रारंभही झालेला नाही. तरीही हाणामारी, धमकवण्याचे प्रकार सुरू झाले अाहेत. विद्यमान नगरसेविका मनीषा अग्रवाल याचे पती प्रवीण महावीर अग्रवाल यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी करीत धमकावण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

  शहरात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना हा प्रकार घडला. हा प्रकार गुरुवारी (दि. ८) सकाळी साडेअाठ तर शुक्रवारी (दि.९)रात्री ९.३० वाजेच्या सुमारात घडला. प्रवीण अग्रवाल यांच्या चक्करबर्डी राेडवरील भाईजीनगरात ते असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या माेबाइलवर ( ९४२३९८२१२२ अाणि ९५५२३१६४२२) वर ७३७८७४९८५७ या क्रमांकावरून वारंवार संपर्क करीत त्यांना तुझी माझ्याजवळ एक क्लीप अाहे. तू मला १० लाख रुपये दे व निवडणुकीला उभा राहू नकाे, नाही तर क्लीप साेशल मीडियावर व्हायऱल करून तुझी बदनामी करेल, अशा शब्दात धमकी दिली.


  याप्रकरणी प्रवीण अग्रवाल यांनी शहर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात माेबाइलधारकांविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी भादंवि कलम ३८५, ५०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास पाेलिस निरीक्षक गणेश चाैधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.डी.खडसे करीत अाहेत, असे पाेलिसांनी सांगितले.


  सध्या राजकीय पक्षांमध्ये जाेरदार जुंपली अाहे. या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढली अ्ाहे. त्याचा परिणाम अंतर्गत गटबाजीवर हाेत अाहे. त्यातून वादही वाढत अाहेत. त्याच वादातून हा प्रकार घडला. मुलात प्रवीण अग्रवाल यांच्या पत्नी यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून अाल्या हाेत्या. सतीश महाले यांच्यासाेबत एकाच प्रभागातून तीनही उमेदवार राष्ट्रवादीचे हाेते. त्यानंतर महाले यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला साेडचिठ्ठी दिली. ते शिवसेनेत गेले. मात्र, तिघा नगरसेवकांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे ते अधिकृतपणे राष्ट्रवादीचेच हाेते.
  त्याचा परिणाम म्हणून प्रवीण महाजन यांच्या पत्नी मनीषा यांनाही शिवसेनेकडे गृहीत धरले गेले. मात्र, त्यांचा अधिकृत प्रवेश अथवा पुन्हा निवडून येण्याची प्रक्रिया घडली नाही. त्यामुळे त्या नेमक्या काेणत्या पक्षाकडे अाहेत, याचा उलगडा झाला नाही. अाता त्या पुन्हा प्रकाशात अाल्या.


  जुन्या धुळ्यातही प्रकार; मात्र नाेंद नाही

  महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण इतके तापले अाहे की, वाद घडताे. मात्र, त्याची बऱ्याचदा नाेंदही हाेत नाही. जुने धुळे भागात दीपावलीच्या एक दिवस अाधी राजकीय कुरबुरी झाल्या. त्यानंतर एकावर वारही झाले. मात्र, त्याची कुठेच नाेंंद अाली नाही. मुळात हे सगळे एकाच ग्रुपमध्ये घडले. त्याचा गवगवा झाला नाही. पाेलिसात नाेंद नसल्यामुळे प्रकरण बाहेर अाले नाही. महापालिकेवर सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीतून अनेक निष्ठावंत म्हणविणारे सध्या वेगळ्या पक्षात जात अाहेत. त्यातून पक्षातही राजकीय कुरबुरी हाेत अाहेत. अाता पुन्हा तिकिटे देण्यावरून वादंग उद्भवणार अाहे,

Trending