आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन सरकारचे काउंटडाऊन सुुरू : नोटबंदी ते एअर स्ट्राइक परिणामकारक ठरतील हे मुद्दे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली। मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या. आज मुद्दे रिकॉल करूया. माहिती करून घ्या, काेणत्या गाेष्टींमुळे यूपीए-2 सत्तेबाहेर झाली. ते मुद्दे मोदी सरकारवर किती परिणामकारक राहतील. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देश रांगेत उभा हाेता. कर प्रणालीच्या संभ्रमात अडकला. या मुद्द्यांचा मोदी सरकारवर काय परिणाम हाेणार?


या वेळचे मुद्दे 
आर्थिक

नोटबंदी : हा आश्चार्यकारक निर्णय हाेता. सरकारने 500 व 1000 च्या नाेटा बंद केल्या. या निर्णयामुळे संपूर्ण देश नाेटा बदलण्यासाठी रांगेत उभा राहिला.

- जीएसटी : सरकारने 17 पद्धतींचे कर व 23 सेस मिळून 17 वर्षांच्या प्रयत्नांनंतर जीएसटी लाँच केले. ‘वन नेशन, वन टॅक्स’ विराेधात भारत बंद पुकारण्यात आला.

- बेरोजगारी : मोदी यांनी दरवर्षी दाेन कोटी नाेकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसचा आराेप आहे की, मागील वर्षी एक काेटी लाेकांच्या नाेकऱ्या गेल्या.  एनएसएसओनुसार 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1% राहिला.


घटनात्मक
सर्वाेच्च न्यायालय : प्रथमच सर्वाेेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माध्यमांकडे आले. तत्कालीन सीजेआय दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

- आरबीआय : सरकारसाेबत झालेल्या वादानंतर गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी आपले पद साेडले.
- सीबीआय प्रमुख : आलोक वर्मा यांना बडतर्फ करण्याचा पद्धतीवर टीका.


सामाजिक
- गाय, मॉब लिंचिंग : पाच वर्षांत बीफ प्रथमच एक मुद्दा म्हणून समाेर आला. मॉब लिंचिंग ची काही प्रकरणे समाेर आली.
- तिहेरी तलाक : मुस्लिम महिलांशी जुडलेला सर्वात माेठा वाद. 
- अॅट्रॉसिटी अॅक्ट व सवर्ण आरक्षण : एससी-एसटी अॅक्ट, सवर्ण आरक्षण परीक्षा राहिली.


अन‌् देशभक्ती
- सर्जिकल स्ट्राइक : 2016 मध्ये उरीत दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पीओकेतील अतिरेक्यांचे कॅम्प नष्ट केले. 
- एअर स्ट्राइक : पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राइकने बदला घेतला. पाकच्या विमानाला परतवून लावताना पायलट अभिनंदन यांना पाकमध्ये अटक. नंतर सुटका. 


मागील निवडणुकीचे मुद्दे आता कुठे आहेत
तेव्हा 10 वर्षांची नाराजी हाेती, आता गायब
अॅण्टी-इन्कम्बन्सी

- 2014 मध्ये यूपीएला 10 वर्षांची नाराजी भाेवली. मोदींविराेधात असे काही नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीत घाेषणा हाेत्या...मोदी तुझसे बैर नहीं...वसुंधरा तेरी खैर नहीं।

भ्रष्टाचार...
राफेलवर चर्चा, पण अण्णांसारखे आंदाेलन नाही

- भ्रष्टाचारविराेधात यूपीए-2 च्या विरुद्ध अण्णा हजारे व  रामदेव यांच्या आंदाेलनामुळे जनता सरकारविराेधात उभी हाेती. मोदींचा काळात राफेल मुद्दा आहे, पण अण्णांसारखे आंदाेलन नाही.


काँग्रेस नेतृत्व
तेव्हा सोनिया-राहुल हाेते...आता राहुल-प्रियंका आहेत
- 2014 मध्ये नेतृत्व सोनिया गांधींकडे हाेते. आता राहुल अध्यक्ष आहेत. प्रियंका गांधी यांचाही राजकारणात प्रवेश झाला आहे.


पीएम चेहरा
तेव्हा विराेधकांकडे पीएम चेहरा हाेता, आता नाही
- 2014 मध्ये विराेधात असलेल्या एनडीएकडे पीएम म्हणून मोदींचा चेहरा हाेता. आता विराेधकांकडे असा काेणताच चेहरा नाही.

बातम्या आणखी आहेत...