आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Counter Article By Dr. M A Wahul On B V Jondhale's 'Namantar Tharav Samantinatrachi 36 Varsha'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोंधळे यांची गोंधळाची स्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"नामांतर ठराव संमतीनंतरची ३६ वर्षे' हा २६ जुलैच्या "भूमिका' पानावरील बी. व्ही. जोंधळे यांचा लेख वाचला. ‘नामांतर हा केवळ पाटी बदलण्याचा लढा नव्हता, तर दलितविरोधी मानसिकता बदलण्याचा लढा होता,' असे अनेक मान्यवरांनी मांडलेले मत नोंदवत अनेक राजकीय पक्ष, संघटनांचा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला पािठंबा असूनही मराठवाड्यात दलितांवर जे अमानुष अत्याचार झाले ते अद्यापही कमी झाले नसल्याचे मत त्यांनी आकडेवारीसह मांडले आहे. या लेखात १) १९७७ मध्ये महाड सत्याग्रहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक झाले पाहिजे, असा विचार मांडणाऱ्यापैकी अरुण कांबळे एक होते. २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठास द्यावे, अशी मागणी पँथर नेते गंगाधर गाडे यांनी ७ जुलै १९७७ रोजी केल्याचे जोंधळे यांनी म्हटले आहे. प्रा. कांबळे आिण गाडे यांचे विद्यापीठ नामांतर चळवळीतील योगदान वादातीत आहे. मात्र, विद्यापीठ नामांतराच्या मागणीचा उल्लेख करताना जोंधळेंनी जाणीवपूर्वक भाषेची अशी मखलाशी केली आहे की, ज्यामुळे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची प्रथम मागणी प्रा. कांबळे आणि गाडे यांनीच केली असावी, असा वाचकांचा समज व्हावा. यासंदर्भात जोंधळे यांचा तरी गोंधळ उडालेला असावा किंवा गांेधळ निर्माण करण्यासाठीच त्यांनी लिहिले असावे, असे म्हणावे लागेल. वास्तविक २६ जून १९७४ ला मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाच्या वतीने मी महाराष्ट्र शासनाकडे लेखी स्वरूपात नामांतराची प्रथम मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्री कार्यालयातून १६ जुलै १९७४ रोजी एक उत्तर असे आले की, मराठवाड्यातील दोन विद्यापीठांपैकी एकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या सूचनेची नोंद घेतली आहे. हे पत्र आजही माझ्या संग्रही आहे. जोंधळेंसहित अनेकांनी ते वाचले आहे. असे असूनही जोंधळे सत्य का दडवत आहेत? १५ जानेवारी १९९४ ला सर्वच वृत्तपत्रांनी शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्राचा आधार घेत ते प्रसिद्धही केले. तो विषय आता संपला आहे. एकाने एकदा मागणी केल्यानंतर पुन्हा कोणी तशी मागणी करू नये, असा नियम नाही. एकदा जोंधळे म्हणतात, गाडे यांनी ७ जुलै ७७ ला नामांतराची मागणी केली तर आधीच्या वाक्यात महाडच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात १ मे १९७७ रोजी प्रा. अरुण कांबळे यांनी बाबासाहेबांचे स्मारक करण्याची मागणी केली; परंतु ती पहिली मागणी नक्कीच नव्हती. मग अाधी गाडे की कांबळे, याचे उत्तर जोंधळे यांनी द्यावे. खरी गंमत पुढेच आहे. गाडे यांचे एकेकाळचे सहकारी दत्ता जाधव म्हणतात, १० एप्रिल १९७७ ला औरंगाबादेत पँथरच्या बैठकीत मीच नामांतरासंदर्भातला ठराव प्रथम मांडला. आणखी एक उदाहरण म्हणजे प्रा. कांबळे यांनी २०० ४
मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाशी झालेला माझा पत्रव्यवहार वाचला होता. त्यानंतर नामांतराचा दावा आपण करणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. दुर्दैवाने ते आता हयात नाहीत. त्यांनी दाखवलेला सुज्ञपणा जोंधळे दाखवतील, अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

डॉ. एम. ए. वाहुळ, महात्मा फुले, राजर्षी शाहू सामाजिक प्रतिष्ठान, गदाना, ता. खुलताबाद.