आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशामधील चॅनल, वृत्तपत्रे मोदी यांना विकली गेलीत ; काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - देशातील टीव्ही चॅनेल, वर्तनमानपत्रे पंतप्रधान मोदी यांना विकली गेली आहेत. त्यामुळे कोणतेही सत्य सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकत नसल्याचे वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. गुरुवारी (दि. २१) कासेगाव येथे त्या बोलत होत्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे २५ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्या मतदारांशी संवाद साधत आहेत. 

 

आमदार शिंदे यांनी मागील निवडणुकीतील शिंदे यांच्या पराभवाचे खापर मीडियावर फोडले. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करून खोटी आश्वासने दिली. त्याला बळी पडून लोकांनी त्यांना निवडून दिले. त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट शेतकऱ्यांची ससेहोलपट झाली. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे. काँग्रेसने केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. देशातील टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रे मोदींनी विकत घेतली आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील (तुंगत) उपस्थित होते. 

 

देशाचे नाव रिलायन्स ठेवतील 
आमदार शिंदे म्हणाल्या, ही लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यात भाजपला हद्दपार करा. पुन्हा मोदी सत्तेत आल्यास देशाचे नाव बदलतील. देशाचे नाव रिलायन्स झाल्याची बातमी आपल्याला वाचावेे लागल्यास आश्चर्य नाही. 

 

योगी, स्वामी यांना मानत नाही 
हिंदू धर्मातील योगी, स्वामी यांचा आदर करते. ते हिमालयात वास्तव्यास असतात. तपश्चर्या करतात. मात्र सत्तेचा मोह असलेले एक योगी मुख्यमंत्री झाले. आता एक स्वामी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अशा योगी व स्वामी यांना आपण मानत नसल्याचे प्रणिती म्हणाल्या. 

बारावीच्या प्रमाणपत्रावर कुठल्या विद्यापीठाचे नाव 
संवाद साधताना आमदार शिंदे यांनी पहिल्यांदा मतदान करणारे कोणी आहे का, हे विचारले. त्यावर एका युवकाने हात वर केला. प्रणिती यांनी त्याला नाव, इयत्ता विचारले. त्याने बारावी असे उत्तर दिले. त्यावर प्रणिती यांनी त्याच्या बारावीच्या प्रमाणपत्रावर सोलापूर की शिवाजी विद्यापीठाचे नाव आहे, असा सवाल केला. तेव्हा एकाने खालून बारावीची परीक्षा पुणे बोर्ड घेते, असे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...