Home | Khabrein Jara Hat Ke | Country with largest muslim population in world had Lord Ganesha Currency

जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशात चलनी नोटांवर श्री गणेश! कारण ऐकूण होईल गर्व

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:03 AM IST

या देशातील 87.5 टक्के लोक मुस्लिम आहेत.

 • Country with largest muslim population in world had Lord Ganesha Currency

  जकार्ता - हिंदू धर्मात भगवान गणेशला सर्वात प्रथम मानले जाते. कुठलीही धार्मिक क्रिया सुरू करण्यापूर्वी बाप्पांची पूजा केली जाते. आपण हा फोटो पाहात आहात त्या चलनी नोटावर भगवान श्री गणेशचे प्रतिबिंब आहे. परंतु, आपल्याला ऐकूण आश्चर्य होईल की हे चलन भारतातील नसून जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश इंडोनेशियाचे आहे. इंडोनेशियात 87.5 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. येथे हिंदूंची संख्या फक्त 3 टक्के आहे.


  नोटांवर बाप्पा कसे?
  नोटवर छापलेले भगवान गणेशचे चित्र इंडोनेशियाचे चलन रूपियाह आहे. तेथील 20 हजारांच्या नोटेवर बाप्पांचा फोटो आहे. प्रत्यक्षात, भगवान गणेशला इंडोनेशियात शैक्षणिक, कला आणि विज्ञानाचा देवता मानले जाते. 20 हजारांच्या नोटांवर समोरून गणेशचा फोटो आणि मागे क्लासरुमचे चित्र आहे. त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी सुद्धा दिसून येतात. सोबतच, नोटवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. देवांत्रा इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याचे नायक होते.


  एक कारण असेही...
  असेही म्हटले जाते, की एकेकाळी इंडोनेशियाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. तेथील अर्थशास्त्रींनी खूप विचार करून 20 हजारांचे एक नोट जारी केले. या चलनावर त्यांनी बाप्पांचा फोटो लावला. लोकांची मान्यता आहे, की नोटवर भगवान गणेशचे चित्र आल्यानंतर अर्थवयवस्था मजबूत झाली. इंडोनेशिया सरकारने 1998 मध्ये अशा स्वरुपाचे 20 हजारांच्या नोटा जारी केल्या होत्या. परंतु, बाप्पांचा फोटो असलेल्या 20,000 च्या नोटा 10 वर्षांनंतर 2008 मध्ये बंद झाल्या.

Trending