आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Country's First 11 Screen Multiplex, Opens In Mumbai, 1586 People Will Watching Film

देशातील पहिले 11 स्क्रीन असणारे मल्टीप्लेक्स, येथे एकाचवेळी 1586 लोक चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईत देशातील पहिले 11 स्क्रीन्स असणारे मल्टिप्लेक्स गुरुवारी सुरु करण्यात आले. येथे तब्बल 1586 लोकांना सहा वेगवेगळ्या प्रयोगशील चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, येथील सीटवरील बटन दाबताच तुम्ही तुमच्या आवडीचे फास्ट फूड ऑर्डर देऊन मागवू शकतात. 

आयनॉक्स ग्रुपचे संचालक म्हणाले की, 'हे मल्टिप्लेक्स 60 हजार चौरस फुटात उभारण्यात आले आहे. या मल्टिप्लेक्ससाठी स्क्रीनएक्स मल्टि प्रोजेक्शन तंत्रज्ञान वापरले आहे. यामुळे प्रेक्षकांना 270 डिग्री पॅनोरॅमिक दृश्ये पाहता येणार आहेत.'

डाव्या - उजव्या बाजुला स्क्रीन 
या स्क्रीनएक्समध्ये, दर्शक त्यांच्या समोरच्या स्क्रीनसह उजव्या-डाव्या स्क्रीनवर देखील चित्रपट पाहू शकतात. या मल्टिप्लेक्समध्ये दररोज 60 शो होणार आहेत. तसेच अंदाजे 6 हजार लोक चित्रपट पाहू शकतील.