आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिला 150 मेगावाटचा फ्लोटिंग सोलर प्लांट, एक यूनिट विजेचा दर 3.30 रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाण्यावर सोलर प्लांट लावल्यामुळे उन्हाळ्यात धरणातील पाण्याची वाफ होणार नाही

रांची- देशातील पहिला 150 मेगावाटचा फ्लोटिंग सोलर प्लांट रांचीच्या रूक्का धरणात लावला जातोय. झारखंड वीज वितरण कंपनी आणि ज्रेडाच्या सहयोगाने हे काम सोलर एनर्जी कॉरपोरेशन ऑफ इंडिया (सेकी) करत आहे. आतापर्यंत फक्त केरळमध्ये 2 मेगावाट आणि महाराष्ट्रात 500 किलोवाटचा फ्लोटिंग सोलर प्लांट होता. त्यातील केरळचा प्लांट पूरात वाहून गेला.रूक्का डॅममध्ये प्लांटच्या विजेचा दर 3.30 रुपयापर्यंत असेल. यातून तयार झालेली वीज झारखंड वीज वितरण कंपनी खरेदी करेल. याची क्षमता 100 ते 150 मेगावाट आहे. जर हा पायलेट प्रोजेक्ट यशस्वी झाला, तर असे प्रोजेक्ट देशातील इतर धरणावरही बांधला जाईल. 
फ्लोटिंग सोलर प्लांटमुळे उन्हाळ्यात पाण्याची वाफ होणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...