आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पहिले क्रीडा विद्यापीठ; मुख्यमंत्र्यांचे पुण्यात शिक्कामोर्तब; खेलो इंडिया उद्घाटन सोहळ्यात दिली माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/औरंगाबाद- औरंगाबादेत राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. पुण्यात 'खेलो इंडिया २०१९' उद्घाटन सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. 'दिव्य मराठी'ने २१ डिसेंबर २०१७ रोजीच याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. मुख्यमंत्री म्हणाले, 'शासनाने मैदानांसाठी अनुदानाची रक्कम वाढवली आहे. आता तालुका स्तरावर ४ कोटी, जिल्हा स्तरावर ८ कोटी व विभाग स्तरावर ४५ कोटी दिले जाणार आहेत. 

 

विद्यापीठासाठी ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक शक्य 
प्रस्तावित क्रीडा विद्यापीठासाठी जवळपास ६०० कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठात अत्याधुनिक सुविधा, विविध खेळांची मैदाने, स्पोर्ट‌्स सायन्स सेंटर, क्रीडा साहित्य, संशोधनासाठी विशेष व्यवस्था, तज्ज्ञ प्राध्यापक, सुसज्ज ग्रंथालय आदी सुविधा असतील. 

 

करोडी परिसरात १७० एकरवर होणार उभारणी 
तत्कालीन जिल्हाधिकारी एन.के.राम आणि क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहराजवळील करोडी परिसरात १७० एकर जागा निश्चित केली होती. एप्रिल २०१८ मध्ये क्रीडा आयुक्तालयात जागेचा प्रस्ताव गेला. क्रीडामंत्र्यांनी मंजुरी दिली. वर्षभरानंतर मुख्यमंत्र्यांनी क्रीडा विद्यापीठावर शिक्कामाेर्तब केले. 

 

बातम्या आणखी आहेत...