आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झंडा ऊंचा रहे हमारा, उणे 30 तापमानात आघाडी लढवणारे देशाचे 'हिमवीर'!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेह : देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. दुसरीकडे देशाच्या सुरक्षेसाठी लष्कराचे जवान सीमेवर प्रतिकूल परिस्थितीतही सज्ज आहेत. भारत-तिबेट सीमावर्ती पोलिसांचे (आयटीबीपी) हे छायाचित्र सुरक्षा दलाच्या शौर्याचे प्रातिनिधिक उदाहरण ठरेल. आयटीबीपीचे सैनिक उत्तर लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर सुमारे १९ हजार फूट उंचीवर, उणे ३० अंश तापमानात तैनात आहेत. येथे प्राणवायूचा प्रमाण कमी आहे. बर्फाळ हवा, हाडेही गोठली जावीत एवढी थंडी. असे असूनही सैनिकांचा जोश थोडाही कमी नाही. म्हणूनच त्यांना हिमवीर संबोधले जाते. त्यांच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात राष्ट्रध्वजाने होते.

५८ वर्षांपासून सरहद्दींचे रक्षक

आयटीबीपीची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली होती. स्थापनेनंतर आयटीबीपीचे सैनिक दुर्गम भारत-चीन सीमेवर तैनात आहेत. ते अरुणाचल प्रदेश व उत्तराखंडपासून लडाखपर्यंत भारत-चीन सीमेवर हिमालयादरम्यान ९ हजार ते १९ हजार फूट उंचीवर तैनात आहेत. भारत-चीन-नेपाळ मिळून येथे सुमारे २ हजार ११५ किलोमीटर सीमेचे रक्षण करतात. सुरुवातीला येथे चार तुकड्या होत्या. आता येथे ४५ तुकड्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...