आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Couple Attempted Suicide Boy Died Of Consuming Poison, Girl Survived And In Hospital

प्रेमीयुगलांची आत्महत्या; प्रियकराने विष खाऊन तर प्रेयसीने लटकली फासावर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदोर- प्रेमप्ररकरणातून एक तरुणाने विष खाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियकराने घरासमोरच असलेल्या त्याच्या प्रेयसीला माहीत झाल्यानंतर तिनेही फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मृताचे नाव रोहित यादव (वय18) आहे. तो नावदा शहरात तेल फॅक्टरीमध्ये पॅकिंगचे काम करत होता.

 

प्रेयसीच्या आई-वडीलांनी दिली होती जिवे मारण्याची धमकी

> बाबुलाल (रोहितचे वडील) यांनी सांगितले की, रोहित तीन-चार दिवसांपासून कामावर न जाता एका तरुणीसोबत दिसल्यामुळे त्याच्या आईने त्याला रागावले. त्यानंतर त्याच्या आईने फोनवरुन तरुणीला शिव्या दिल्या. तरुणीच्या घरी समजल्यानंतर त्यांनी घरी येऊन रोहितला त्यांच्या मुलीसोबत दिसला तर जिवे मारण्याची धमकी दिली.

 

रात्री मेडिकल स्टोरमध्ये गेला होता रोहित

> संतोष(मोठा भाऊ)ने सांगितले की, 'सकाळी रोहितच्या एका मित्राने त्याला रात्री उशीरा मेडिकल स्टोरमधून येताना पाहीले. सकाळी 7 वाजता मी त्याला उठवण्यासाठी गेलो तर त्याच्या तोंडातुन फेस बाहेर येत होता. त्याला दवाखान्यात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.' 

 

तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती

> तरुणीच्या वडीलांनी सांगितले की, ती बीकॉमच्या पहिल्या वर्षाला होती. तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती. बुधवारी रोहितच्या आईचा तिला फोन आल्यानंतर ती जास्तच गोंधळलेली होती.  सकाळी तिच्या आईने तिला रागवले तेव्हा तिने वरच्या खोलीत जाऊन आतून दार बंद केले. आम्ही तिच्या खोलीकडे जाऊन धक्का देत दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ती फासावर लटकलेली दिसली. आम्ही तिला खाली उतरवून दवाखान्यात घेऊन गेलो. तिथे तिच्यावर उपचार सुरू असुन तिची प्रकृती स्थिर आहे.

बातम्या आणखी आहेत...