आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत तक्रार का दिली म्हणून दांपत्यास मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार का दिलीस, असे म्हणत एकाने जगन्नाथ हरिश्चंद्र पाटे (४४, रा. गुलमोहर कॉलनी, सिडको) या दांपत्यास शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. दरम्यान, तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. ही घटना १६ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. नितीन दिगंबरराव देशपांडे (४८, रा. गुलमोहर कॉलनी, सिडको) यांचा घराजवळ राहणाऱ्या जगन्नाथ पाटे यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. पाटे यांनी नितीन देशपांडे याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. १६ डिसेंबर रोजी जगन्नाथ पाटे हे आपल्या घरात असताना नितीन देशपांडे हा त्यांच्या घरात घुसला, त्याने जगन्नाथ पाटे व त्यांच्या पत्नीस अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच घरासमोर पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी (एमएच २० ईडब्ल्यू ८६३८), सचिन डबीर यांच्या मालकीची दुचाकी (एमएच २० ईसी ८३४३) आणि (एमएच १८ ए ४९०८) यांच्यावर दगड मारून दुचाकींचे नुकसान केले. 

बातम्या आणखी आहेत...