Accident / उधळलेल्या जनावरांवर दुचाकी धडकली; भरधाव ट्रॅव्हल्सखाली चेंगरून दांपत्य ठार

बदनापूरजवळील कृषी केंद्रासमोर घडली घटना

दिव्य मराठी

Jul 22,2019 08:33:00 AM IST

बदनापूर - सासू आजारी असल्याने शेकटा येथे नारळपाणी घेतले. यानंतर दुचाकीहून बदनापूरकडे जात असताना अचानक एका शेतातून जनावरे उधळत आली. यामुळे दुचाकी जनावरांवर धडकली. या धडकेने दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर पडले. याच वेळी मागून येणारी भरधाव ट्रॅव्हल्स बस दोघांच्या अंगावरून गेल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना औरंगाबाद-जालना रोडवरील बदनापूर येथे कृषी केंद्रासमोर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. हमीद पठाण (४५), ताहेरा हमीद पठाण (४१, शेकटा, जि. औरंगाबाद) अशी मृत दांपत्याची नावे आहेत.

बदनापूर तालुक्यातील अकोला या गावची हमीद पठाण यांची सासुरवाडी आहे. त्यांच्या सासूची तब्येत खराब असल्यामुळे ते पत्नी ताहेरा यांच्यासह दुचाकीने सकाळी शेकट्याहून बदनापूरकडे निघाले होते. दरम्यान, ११.३० वाजेदरम्यान बदनापूर कृषी संशोधन केंद्राजवळ काही जनावरे अचानक रस्त्यावर अाली. यामुळे ते दुचाकी चालवताना थोडे बिचकले. यातच त्यांचा जनावराला धक्का लागून दोघेही रस्त्यावर पडले. एवढ्यात आलेल्या ट्रॅव्हल्सखाली ते चेंगरले गेले. यात दोघांचाही मृत्यू झाला.

X