आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कारने दिली धडक; अंत्यविधीसाठी जाणारे दांपत्य अपघातात ठार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- पैठण-नवगाव येथून भरधाव कारने रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या दांपत्याला धडक दिल्याने पती-पत्नी ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. २ फेब्रुवारी) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली. आत्माराम बाबूराव गावंदे (५५) व मंगला आत्माराम गावंदे (५०) अशी अपघातात ठार झालेल्या दांपत्याची नावे आहेत. 

 

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण-नवगाव रोडवर नायगाव फाट्याच्या पुढे चंदू निवारे यांच्या शेताजवळ भरधाव ब्रेझा कार (एमएच२०/७२७३) चालकाने रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या दुचाकीला (एमएच २० डीक्यू/३२२१) जोराची धडक दिल्याने दुचाकीसमोर उभे असलेले पती-पत्नी आत्माराम बाबूराव गावंदे (५५) व मंगलाबाई आत्माराम गावंदे (५०, रा. तुळजापूर, ता. पैठण) गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी पती-पत्नीस येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांनी मदत करत एका खासगी वाहनाद्वारे पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. परंतु डॉक्टरांनी दोन्ही जखमींना तपासून पुढील उपचाराकरिता औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान गंभीर जखमी दांपत्याचा मृत्यू झाला. 
 

बातम्या आणखी आहेत...