आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यमुनानगर : चॉकलेट डे साजरा करून रात्री घराच्या छतावर भेटण्यासाठी पोहोचलेले प्रेमी युगुल 11 केव्ही विजेच्या तारींच्या विळख्यात आले. दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. शहरातील शिवनगर भागामध्ये घडलेली तेव्हा समोर आली जेव्हा कुटुंबियांना मुलगी घरामध्ये आढळून आली नाही. मुलीची आई मुलीला शोधण्यासाठी घराच्या छतावर गेल्यानंतर तिला शेजारील घराच्या छतावर दोन शव (दोघांचेही शव पाच-पाच फूट अंतरावर होते) दिसले. एक शव तिच्या 15 वर्षीय मुलीचे होते. दोन भावांची ती एकुलती एक बहीण होती. तरुण सन्नी (19) तीन बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. तरुणाच्या कुटुंबीयांनी पहिले मुलाचा खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला. परंतु पोलिसांना दिलेल्या जबाबात ही घटना अचानक घडल्याचे सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनीही कोणताही आरोप लावला नाही.
घराच्या छतापासून दोन फूट उंच होती विजेची तार
ज्या घराच्या छतावर ही घटना घडली तेथून 11 केव्ही विजेची तार गेलेली आहे. ही तार छतापासून केवळ 2 फूट उंचीवर आहेत. घराच्या मालकाने आपल्या सेफ्टीसाठी छतावर एक भिंत बांधली आहे. कुटुंबातील सदस्याचा तारींना स्पर्श होऊन नये यासाठी मालकाने भिंत बांधून घेतली होती. मुलीच्या घराच्या छतावर कोणतीही भीत नाही. यामुळे सन्नी आणि मुलगी दोघेही नवीन घराच्या छतावर भेटण्यासाठी पोहोचले. रात्रीच्या अंधारामुळे त्यांना लाईटच्या तरी दिसल्या नसाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाच महिन्यांपूर्वी मुलीला भेटला होता तरुण, गिफ्ट दिला होता मोबाईल
सन्नीने मुलीला एक मोबाईल दिला होता. नोव्हेंबर महिन्यात त्या मोबाईलवरून बोलताना मुलीच्या वडिलांनी तिला पकडले होते. तेव्हा मुलीने, मोबाईल सन्नीने दिला असल्याचे सांगितले. पंचायतमध्ये तरुणाला चापटी मारण्यात आल्या आणि पुन्हा मुलीला भेटायचे नाही असे सांगून समज देण्यात आली होती. त्या घटनेनंतरही दोघांमध्ये चर्चा सुरु होती. मुलगी आठवीत शिकत होती. तरुण फर्निचरचे काम शिकत होता. दोघेही शाळेतून येताना-जाताना भेटत होते. दोघेही एकाच कॉलनीत राहत होते. दोघांच्या घरामध्ये जवळपास 200 मीटरचे अंतर आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.