आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - ब्रिटनच्या 28 वर्षीय जेनिन आणि शेन यांना हनीमून साजरे करून आल्यानंतर आता जेलचा सामना करावा लागत आहे. लंडनमध्ये लग्न केल्यानंतर ते ड्रीम हनीमून साजरे करण्यासाठी 5 दिवसांकरिता न्यूयॉर्कला गेले होते. परंतु, एका चुकीमुळे त्यांना आता 3 महिन्यांची कैद होऊ शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या मधुचंद्राच्या ट्रिपवर मुलीला नेले होते. या दरम्यान त्यांच्या मुलीची शाळा 5 दिवस बुडाली. विशेष म्हणजे, ब्रिटनमध्ये शाळा आणि शिक्षणसंदर्भातील कायदे अतिशय कठोर आहेत. यात योग्य कारण न दाखवता मुला-मुलींना शाळेत पाठवले नाही तर पालकांना कैद होऊ शकते.
काय आहे प्रकरण?
28 वर्षीय जेनिन आणि शेन यांनी रिलेशनशिपमध्ये राहून एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला. मुलगी 7 वर्षांची आणि मुलगा एका वर्षाचा झाल्यानंतर त्यांनी याच महिन्यात विवाह केला. या विवाहानंतर ते ड्रीम हॉलिडे म्हणून 5 दिवसांसाठी न्यूयॉर्कला गेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीच्या शाळेत प्रिन्सिपलला फोन करून सुटी घेत असल्याची माहिती दिली होती. यावर योग्य कारण असेल तरच आपण सुटी घेऊ शकता असे प्रिन्सिपलने म्हटले होते. मात्र, हनीमूनचे कारण समोर येताच प्रिन्सिपलने मुलीच्या पालकांना 60 ब्रिटिश पाउंड अर्थात जवळपास 6 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तो पालकांनी मान्य केला नाही आणि प्रिन्सिपल विरोधात कोर्टात गेले. त्याचाच फटका आता पालकांना बसू शकतो.
तो हनीमून नव्हे, एजुकेशनल टूर असल्याचा दावा
कोर्टात आई जेनिनने हनीमूनवरून परतल्यानंतर विचित्र दावा केला. हा दौरा हनीमून नसून एक शैक्षणिक सहल होती. न्यूयॉर्कमध्ये आपण मुलीला 9/11 मेमोरिअल, वॉलस्ट्रीट, हिस्ट्री म्युझिअमसह विविध गोष्टी दाखवल्या असा दावा केला. परंतु, कोर्टाने त्यांचा युक्तीवाद फेटाळून लावला आणि शाळेच्या नियमांचा दाखला दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.