आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात फिरण्यासाठी गेले कपल, रूममधली घड्याळ पाहून 20 मिनिटांमध्येच हॉटेल सोडून गेले पोलिसांकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरंटो - स्कॉटलंडचे एक कपल सुट्या एन्जॉय करण्यासाठी कॅनडाला गेले होते. दिवसभर फिरल्यानंतर रात्री ते हॉटेलमध्ये पोहोचले. त्याचवेळी त्यांना खोलीत एक डिजिटल घड्याळ दिसले. या घड्याळीला एका फोनच्या चार्जरसारखी वायर होती. गी घड्याळ पाहताच काहीतरी गडबड असल्याचा अंदाज या कपलला आला. त्यांनी जेव्हा चेक केले तेव्हा त्या घड्याळीतून कॅमेरे निघाले. त्यानंतर कपलने 20 मिनिटांत रूम सोडली आणि या प्रकरणी रिपोर्ट दाखल केला. 

 
घड्याळात गडबड असल्याचे आले लक्षात 
ग्लास्गोचे 34 वर्षीय डॉजी हॅमिल्टन गर्लफ्रेंडबरोबर हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी कॅनडाच्या टोरंटोमध्ये गेले होते. एक दिवस ते रूममध्ये आले तेव्हा त्यांना बेडजवळ एक घड्याळ दिसली. तिला एक वायर जोडलेली होती. त्यांनी ती घड्याळ हातात घेताच त्यांना जाणवले की हे कॅमेरे असू शकतात आणि त्यांचे रेकॉर्डींग केले जात असेल. डॉजी यांनी वायर काढून बॅटरी लेव्हल पाहिली आणि नंतर घड्याळ चेक केली तेव्हा खरंच त्यात कॅमेरे लावलेले होते. 

 
20 मिनिटांत सोडले हॉटेल 
डॉजी यांनी सांगितले की कॅमेऱ्याचे तोंड लिव्हींग एरिया आणि बेडरूमकडे होते. त्याद्वारे सर्वकाही दिसत होते. पण त्याचे लाइव्ह स्टि्रमिग कोण करतेय हे समजत नव्हते. हे समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. 20 मिनिटांत त्यांनी ही रूम सोडली आणी याबाबत पोलिस तसेच ज्याठिकाणाहून रूम बूक केली होती, त्याठिकाणी तक्रार केली. 

 

बातम्या आणखी आहेत...