आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेंडेविले- अमेरिकेतील लुसियानामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याला त्यांच्या घरातील कचऱ्याने कोट्याधिश बनवले आहे. हेरोल्ड एहरेनबर्ग आणि त्याची पत्नी टीना एहरेनबर्ग असे या दाम्पत्याचे नाव असुन घराची सफाई करत असताना त्यांना हरवलेले लॉटरीचे तिकीट सापडले. दाम्पत्याने तिकीटाचा नंबर तपासल्यानंतर हे विनिंग तिकीट असल्याचे समजले. या तिकीटाने दाम्पत्याला 18 लाख डॉलर म्हणजे जवळपास 12.7 कोटी रुपये जिंकुन दिले.
खरेदी केलेले लॉटरीचे तिकीट हरवले
काही दिवसांपुर्वी या दाम्पत्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते परंतु निष्काळजीपणामुळे त्यांच्याकडुन ते तिकीट हरवले होते. लॉटरीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर त्यांनी तिकीट शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते तिकीट सापडले नाही. त्यामुळे त्यांनी तिकीट सापडण्याची आशा सोडली होती. 'थँक्स गिव्हींग डे'ची तयारी करत असताना टीनाला कचऱ्यात हरवलेले लॉटरीचे तिकीट सापडले. टीनाने तिकिटांच्या नंबरला लॉटरीच्या वेबसाइटवर तपासल्यानंतर तिला ते तिकीट विनिंग नंबर असल्याचे समजले आणि या दाम्पत्याचे नशिब उजळले. या लॉटरीच्या तिकीटाने या दाम्पत्याने 12.68 कोटी रुपये जिंकले.
दोन आठवड्यानंतर तिकीट झाले असते बाद
लॉटरी कंपनीच्या नियमांनुसार रिझल्ट घोषित झाल्यानंतर 180 दिवसांच्या आत विनिंग तिकीटाचा दावा करावा लागतो. टीनाला सापडलेल्या तिकीटाच्या लॉटरीचा रिझल्ट 6 जून 2018 रोजी लागला होता. त्यानंतर 6 डिसेंबरला ते सापडलेले लॉटरीचे तिकीट बाद होणार होते. परंतु दोन आठवड्यांआधीच या दाम्पत्याला हे लॉटरीचे तिकीट सापडले आणि हे दाम्पत्य कोट्याधिश झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.