आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी पती-पत्नीवर बिबट्याचा हल्ला; पत्नीला वाचवण्यासाठी पतीची तासभर बिबट्याशी झुंज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोयगाव - जंगलक्षेत्रानजिक शेतात निंदणी करणाऱ्या पती-पत्नीवर बांधावरील गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना कवली शिवारात रविवारी (दी.२१) घडली. पत्नीवर बिबट्याने झडप मारल्याचे लक्षात येताच पतीने बिबट्याशी तासभर संघर्ष करून पत्नीला सोडवले. पण बिबट्याने डाव साधत पतीला जबड्यात धरत जबर जखमी. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 


कवली (ता. सोयगाव) शिवारात भारत हरिचंद चव्हाण (३०) आणि मनीषा भारत चव्हाण (२३, दोघे रा. वरसाडा) हे शेतात खुरपणीचे काम करत असताना शेतीच्या बांधावर गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पहिल्यांदा मनीषा चव्हाण यांच्यावर झडप मारून पंजांत दाबून धरले. दरम्यान मागून खुरपणी करत येत असलेल्या भारत चव्हाण यांच्या  हा प्रकार लक्षात येताच त्याने बिबट्याशी तासभर संघर्ष करून पत्नीची सुटका केली. मात्र चवताळलेल्या बिबट्याने शिताफीने भारतला जबड्यात धरल्याने पत्नीने आरडाओरडा केल्याने जवळच असलेल्या अजमोद्दीन तडवी, मनोज पाटील आणि विष्णू पाटील यांनी बिबट्याशी पुन्हा अर्धा तास संघर्ष करून भारतला बिबट्याच्या तावडीतून सोडव हुसकावून लावले. दरम्यान यात भारत व त्याची पत्नी मनीषा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत भारतच्या शरीरावर आणि पायाच्या व हाताच्या मणक्याला गंभीर दुखापत झालेली असून त्याच्या पत्नीला कंबरेला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान बिबट्याच्या जबड्यात अर्धातास असलेल्या भारत चव्हाणच्या मानेला व पोटाला गंभीर जखमा झाल्या. 

 

 

बातम्या आणखी आहेत...