आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीयुगुलाने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या, मृत्यूआधी केली अखेरची फेसबूक पोस्ट- \'अविवाहित समजून आम्हाला दफन करू नका...\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुरहानपुर- 8 दिवसांपूर्वी गावातुन पळुन गेलेल्या प्रेमी युगुलाने सोमवारी रात्री 11 वाजता शिर्डीमध्ये ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्त्या केली. त्यांच्या मित्रांना 4 पानांचे सुसाईड नोट मिळाले आहे, त्यात त्यांनी आत्महत्ये मागची सर्व गोष्ट लिहीली आहे. त्यात हेही लिहिले की, आम्ही मेल्यानंतर अजून कोणाला प्रेम करण्यापासून अडवु नका.

 

चौंडी निवासी प्रियंका भावसा येथील होती, आणि ती 12वीत शिकायची. ती आणि तिचा प्रेमी राधे हे दोघे पळुन गेल्यानंतर त्यांच्या एका मैत्रिनींने त्यांना फोन करून सांगितले की, गावात ते पळून गेल्याची बातमी पसरली आहे. गावात गेल्यावर आपली अब्रु जाईल या भितीने त्यांनी शिर्डीत ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्त्या केली. आत्महत्त्या करण्यापूर्वी दोघांनी लग्न केले होते. प्रियंकाचे वडील चौंडीमधील एका शाळेत शिकवतात, तर राधेच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो पुण्याच्या एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा. मंगळवारी त्यांच्या कुटुंबीयांनी शिर्डीत जाऊन मृतदेह ताब्यात घेतले.


फेसबूकवर 4 पेजचे सुसाईड नोट आणि फोटो अपलोड केला...
प्रियांकाने लिहीले की,-" 9 वर्षांपासून आमचे प्रेम सुरू होते. शिक्षण संपल्यावर आम्हाला लग्न करायचे होते. 18 डिसेंबरला राधे सोबत साखरपूडा करण्यासाठी अच्छादेवी मंदीरात गेले. त्यानंर आम्ही घरी येणार होतो पण त्याआधीच शाळेतील मुलींना घरी सांगितले, भावाने शाळेत जाऊन चौकशी केली आणि त्यामुळेच गावात सगळीकडे ही बातमी पोहचली की आम्ही दोघे गायब झालो आहोत. गावात आमची अब्रू गेली होती. घरी गेले असते तर शाळा सोडायला लावली असती आणि राधेपासून वेगळं केलं असत. त्यामुळे आम्ही त्या दिवशी पळून गेलो. आम्हाला पाहावल नसतं की, आमच्यामुळे कुटुंबातील लोकांना त्रास होईल. आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे आम्ही आत्महत्त्या करत आहोत. आमची एक विनंती आहे की, मेल्यानंतर आम्हाला वेगळ करू नका. आम्हचा सोबतच अंत्यविधी करा." त्यांनी हे सगळे लिहून पोस्ट केले आणि आत्महत्त्या केली.

 

बातम्या आणखी आहेत...