आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबूकवर या तरुणीने केली एकच चूक, 45 मिनिटांत झाली कंगाल..! आता लोकांना देते हा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या एका तरुणीला फेसबूकची मदत घेणे इतके महागात पडले की ती अवघ्या काही मिनिटांत बरबाद झाली. तिने आपल्या घरातील साहित्य शिफ्ट करण्यासाठी फेसबूक सर्च केले. त्यावरून तिला एका कंपनीची माहिती मिळाली. चांगले रिव्ह्यू असल्याचे पाहता तिने शिफ्टिंगचे काम त्याच कंपनीला दिले. अगदी प्रोफेशनल वर्कर्सप्रमाणे कामगार आले आणि 45 मिनिटांत तिच्या घरातील प्रत्येक वस्तू पॅक करून वाहनात भरले. यानंतर ते असे निघाले की पुन्हा कधी आपले तोंड सुद्धा दाखवले नाही. या एका चुकीने तिला आयुष्यभराचा धडा शिकवला आहे. 


45 मिनिटांत झाली बरबाद
> मार्क हिगिन्स आणि बेकी जोन्स यांचा नुकताच साखरपुडा झाला. ते एकमेकांपासून 13 किमी दूर राहत होते. त्यामुळे, एकाच ठिकाणी राहण्याच्या निमित्ताने बेकीने शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. बेकीने यासाठी फेसबूकच्या माध्यमातून शिफ्टिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांची माहिती काढली. यात तिला एका जाहिरातीने आकर्षित केले. फीडबॅक आणि एकूणच समाधानी ग्राहक पाहून तिने या कंपनीला कंत्राट दिला. 
> बेकीने कंपनीचा माणूस ग्रीन लीशी थेट संपर्क साधला आणि आपली गरज व्यक्त केली. त्याने शिफ्टिंग करण्यासाठी दोन माणसे बेकीच्या घरात पाठवली. अवघ्या 45 मिनिटांत त्यांनी बेकीच्या घरातील सर्व सामान व्यवस्थित गुंडाळून ट्रकमध्ये भरला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, ते सामान नेमके कुठे ड्रॉप करायचे हे त्यांनी विचारलेच नाही. तसेच बेकीने सुद्धा त्यावर लक्ष दिले नाही. 
> सुरुवातीला आपण पत्ता देण्यास विसरलो असे बेकीला वाटले. यानंतर तिने ग्रीन ली याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आपल्या हातून किती मोठी चूक घडली हे तिच्या लक्षात आले. तिच्या घरातील कागदपत्रे, फर्निचर आणि प्रत्येक साहित्य लुटले होते. गत अशी झाली की तिला दुसऱ्या दिवशी अंगावर घालण्यासाठी घरात कपडेही नव्हते. टीव्ही फुटू शकतो म्हणून तिने आपल्याकडे ठेवला होता. आता केवळ हा टीव्हीच तिच्याकडे उरला आहे. 


आयुष्यभर विसरणार नाही

या घटनेनंतर बेकी आणि मार्क डिप्रेस झाले आहेत. त्यांनी पोलिसांत तक्रार करून आपल्या बचतीतून नवीन सामान खरेदी करण्यास सुरुवात केली. परंतु, लग्नासाठी केलेली सेव्हिंग फर्निचरवर खर्च झाल्याने आता लग्न कसे करणार असा प्रश्न त्यांना पडला आहे. फेसबूकवर झालेली ही एक चूक ती आता आयुष्यभर विसरणार नाही. सोबतच, इतरांनी सुद्धा कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नये असा सल्ला तिने दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...