आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेघर व्यक्तीला मदत करण्याच्या नावाखाली झाला कोटींचा स्कॅम, व्यक्ति म्हणाला- \'मला पैसे मिळालेच नाहीत...\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूजर्सी- अमेरिकेत बेघर व्यक्तीला मदत करण्याच्या नावाखाली हेराफेरी करणारी महिला आणि तिच्या ब्वॉयफ्रेंडच्या खटल्यात आता नवीन वळण आले आहे. न्यूजर्सीच्या या कपलवर बेघर व्यक्तीला मदत करण्याच्या नावाखाली 2 कोटी 87 लाख रूपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. या खटल्यात त्यांना 10 वर्षाची शिक्षा होउ शकते. पण आता ती महिला म्हणत आहे की, तिला या हेराफेरीची माहितीच नव्हती. हे स्कॅम समोर येताच ती तिच्या बॉयफ्रेंड पासून वेगळी झाली. मध्यरात्री महिलेची गाडी बंद पडल्यानंतर त्या व्यक्तिने तिची मदत केली होती. त्यानंतर त्या महिलेने फंड गोळा केला, ज्यानंतर या स्कॅमची घटना समोर आली आहे. 

 

स्कॅमची नव्हती कल्पना
- या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी झाली, ज्यात त्या महिलेच्या वकिलांनी सांगितले की, तिला या स्कॅम बद्दल काहीच माहिती नव्हती.


- ते म्हणाले की, जेव्हा तिला या स्कॅमची माहिती मिळाली तेव्हा तिने ब्वॉयफ्रेंड सोबतच नातं तोडलं आणि ती आता वेगळी राहते.


- पाउने 3 कोटीच्या स्कॅमच्या प्रकरणात केट आणि तिच्या ब्वॉयफ्रेंडला आरोपी घोषित केले आहे. जर हा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना 10 वर्षापर्यंतची शिक्षा होउ शकते. 

 

काय आहे पुर्ण घटना ?
- न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या केटसोबत एक घटना घडली. तिच्या गाडीचे पेट्रोल संपले आणि तिच्याकडे पैसेपण नव्हते. त्यावेळी तेथे एक बेघर व्यक्ति आला आणि त्याने त्याच्या जवळ असलेल्या पैशाने पेट्रोल आणले आणि केटला दिले.


 - त्या व्यक्तीची उदारता पाहून केटचे मन भरून आले, आणि तिने त्या व्यक्तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने एक वेबसाइट उघडली आणि त्याद्वारे फंड गोळा करण्याचे आव्हान केले. त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला, आणि 2 कोटी 92 लाख जमा

झाले.

 

अर्धी रक्कम पण नाही मिळली
- त्या व्यक्तीने या रकमेतुन फक्त 53 लाख मिळाल्याचे सांगितले. तर वेबसाइट बनवणाऱ्या कंपनीने सांगितले की, जमा झालेल्या पैशाचा त्या दोघांनी दुरूपयोग केला आहे. आता हे प्रकरण न्यायालयात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...