आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरातील प्रेमीयुगुलाची विष पिऊन शेगावात आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - नागपूर येथील प्रेमीयुगुलाने शेगावाच्या हॉटेलमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

नंदू कृष्णाजी मसराम (४० रा. गोंधणी धामणा, नागपूर)  आणि भारती कैलास सुरपाम (३० रा. सालई गोंधणी धामणा, नागपूर) असे मृत प्रेमी युगुलाचे नाव आहे. या जोडप्याने सोमवारी सकाळी गेस्ट हाऊस मध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सालई गोंधणी धामणा, नागपूर येथील रहिवासी असलेले नंदू कृष्णाजी मसराम आणि भारती कैलास सुरपाम या प्रेमी युगलाने ५ ऑक्टोबर रोजी शेगाव येथे येऊन एका खासगी हॉटेलमध्ये २०५ क्रमांकाची खोली भाड्याने घेतली. हे जोडपे दोन दिवस सोबत राहिले. मात्र, सोमवारी सकाळपासून ते राहत असलेल्या २०५ क्रमांकाच्या खोलीतून काहीच हालचाल दिसत नसल्याने आणि प्रतिसाद मिळत नसल्याने हॉटेल मालकाने खोलीत जाऊन पाहणी केली असता दोघेही पलंगावर मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. 
 

पोलिसांनी सुरू केला सर्व बाजूंनी तपास
हॉटेल मालकाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मास्टर कीद्वारे खोलीचा दरवाजा उघडून पंचनामा करून दोन्ही प्रेत ताब्यात घेतले. दोघांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे दिसून आले. या दोन्ही मृतांच्या नातेवाइकांना नागपूर पोलिसांच्या माध्यमातून कळवण्यात आले आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. प्रकरणी शहर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पोलिस सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...