सावकाराने सतत तगादा लावल्याने दांपत्याने घेतले विष, पतीचा मृत्यू

दिव्य मराठी

Apr 29,2019 10:40:00 AM IST

वरुड (जि.अमरावती) - सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकरी दांपत्याने विष प्राशन केल्याची घटना वरुड तालुक्यातील चिंचारगव्हाण पुनर्वसन गावात घडली. उपचारादरम्यान सोपान गंगाधर शेलोटे (३८) यांचा मृत्यू झाला, तर वंदना सोपान शेलोटे (३२) मृत्यूशी झुंज देत आहेत.


सोपान आणि वंदना गुरुवारी लग्नसमारंभात जातो, असे सांगून घरून निघाले. मात्र, रात्र होऊनही दाेघेही घरी परतलेच नाहीत. तालुक्यातील सुरळी गावात या दाेघांनी विष प्राशन केल्याची माहिती कुटुंबीयांना गुरुवारी सायंकाळी समजली. त्यानंतर दाेघांनाही गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, नंतर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. शनिवारी मध्यरात्री सोपान शेलोटे यांचा इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

X