आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Couple Was Making TikTok Videos, Their Baby Boy Did Dangerous Stunt After Them, Video Going Viral

TikTok वर कपल बनवत होते रोमँटिक Video, त्यांच्या मागेच असलेल्या चिमुकल्याने केले असे काही; सोशल मीडियावर संताप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अनेक असे घातक स्टंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे करताना लोकांचा जीव जातो. किंवा मग ते गंभीर जखमी होतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आई वडिलांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आणि बेडवरून उडी मारतो. 3 वर्षांचा मुलगा आपल्या आईला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आणि बेडवरून उडी मारतो. खाली दुसरा बेड होता ज्यामुळे मोठा अपघात टाळला. हा व्हिडीओ मुलाच्या इंस्टाग्राम अकाउंट bonor_gabriel वर शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ चुकीच्या कारणाने व्हायरल होत आहे. 

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, गॅबरियलची आई वेटा अनानास पती एंड्री याच्या अंगावर उडी मारत आहे. मुलगा आईला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आणि तो बेडवरून खाली उडी मारतो. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये दाखवला गेला आहे, ज्यामुळे हा खूपच भयावह आणि घातक वाटतो. 3 वर्षीय गॅबरिल मॅट्रेसवर पडतो आणि त्यामुळे त्याचा जीव वाचतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्या पालकांची खूप निंदा करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'हा व्हिडीओ फनी यामुळे आहे कारण मुलगा पडल्यानंतर हसतो. पण जर या मुलाची मन मोडली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. आईवडिलांनी मुलांसमोर असे काही करताना काळजी घेतली पाहिजे.'

बातम्या आणखी आहेत...