Home | Khabrein Jara Hat Ke | Couple Welcomes a Baby After Thinking Wife Has Kidney Stones

मित्रांसोबत डिनरसाठी गेले होते कपल, तेव्हाच पत्नीच्या पोटात होऊ लागल्या खूप वेदना, किडनीमध्ये स्टोन्सचा होता प्रॉब्लेम, वाटले त्याचमुळे होत आहे त्रास 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 12:39 PM IST

वेदना सहन करणे झाले कठीण तर हॉस्पिटलला पोहोचले कपल, तर मिळाले आयुष्यातील सर्वात मोठे सरप्राइज

 • Couple Welcomes a Baby After Thinking Wife Has Kidney Stones

  लूसियाना : अमेरिकामध्ये एका कपलला आयुष्यातील सर्वात मोठे सरप्राईज मिळाले. दोघे मित्रांसोबत डिनरसाठी गेले होते, पण तेव्हाच पत्नीच्या पोटात खुप वेदना होऊ लागल्या. दोघांना वाटले हे किडनीमध्ये स्टोन्स असल्यामुळे होत असेल. नवऱ्याने तिला लगेच हॉस्पिटलला नेले. पण तिथे जेव्हा डॉक्टर्सने तिला पहिले तेव्हा कळले कि हे खरे तर लेबर पेन आहे. दोघेही हे ऐकून खूप हैराण झाले कारण त्यांना कधी प्रेग्नन्सीचे कोणतेही लक्षण दिसले नाही. कपलने आता मुलीच्या जन्मानंतर आपली कहाणी शेयर केली आहे.

  पोटाच्या वेदना निघाल्या लेबर पेन....
  - लूसियानामध्ये राहणारी 19 वर्षांची ग्रेस आणि 20 वर्षांचा ब्रायसन आपल्या मित्रांसोबत डिनरसाठी गेले होते.
  - डिनरदरम्यान ग्रेसच्या पोटात खूप वेदना होऊ लागल्या. ग्रेस म्हणाली की, आम्हाला दोघंही वाटले या वेदना किडनीमधील स्टोन्समुळे होत असावे.
  - ब्रायसन तिला सांभाळत होता. पण जेव्हा त्रास खूप वाढला तेव्हा तो पत्नी ग्रेसीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.
  - तिथे जेव्हा डॉक्टर्सने चेकअप केले तेव्हा कळाले की, ग्रेस प्रेग्नन्ट आहे आणि तिला लेबर पेन होत आहे. याच्या काही वेळानंतरच ग्रेसने मुलीला जन्म दिला.

  अचानक मिळाली पेरेंट्स बनण्याची बातमी...
  - ग्रेस आणि ब्रायसन दोघेही प्रेग्नन्सी आणि पेरेंट्स बनल्यामुळे हैराण आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना या गोष्टीचा काहीच अंदाज नव्हता आणि 9 महिन्यात त्यांना असे काही लक्षणही दिसले नाहीत.
  - ग्रेसनुसार, बर्थ कंट्रोलवर होती आणि ना तिचा एकही पीरियड मिस झाला. एवढेच नाही तर तिने अशातच प्रेगनन्सी टेस्टदेखील केली होती, जी नेगेटिव आली होती.
  - ग्रेसला कधी कोणती मॉर्निंग सिकनेसदेखील जाणवली नाही. तिचे वजनदेखील वाढले नाही.
  - ग्रेस म्हणते की, आता जेव्हाही मुलीवर नजर पडते तेव्हा एकच गोष्ट डोक्यात येते की, हे असे कसे झाले. मी खूप नशीबवान आहे आणि खुश आहे.

  लोकांकडे मागितली मदत...
  - आता कपलने गो फाउंड मी पेज बनवून लोकांकडे मुलीच्या खर्चासाठी मदत मागितली आहे. कपलचे म्हणणे आहे की, आम्हाला याबद्दल काही माहीतही नव्हते आणि आम्ही यासाठी तयारही नव्हतो.
  - कपलनुसार, त्यांच्याकडे आता मुलीच्या खर्चासाठी पैसे जमवायला वेळ नाहीये त्यांना लवकरच पैशांची गरज आहे, कारण त्यांच्याकडे सेव्हिंग नाहीये.

Trending