आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मापासून अपंग होईल बाळ, सोनोग्राफीत डॉक्टरांना कळाली होती बाळाची कंडिशन, मग डॉक्टरांनी पोटातच केले अशक्य ऑपरेशन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


साउथ ग्लोस- इंग्लंडच्या साउथ ग्लोसमध्ये एका कपलने जगातिल सगळ्यात अवघड ऑपरेशनद्वारे निरोगी बाळाला जन्म दिला आहे. येथील 21 वर्षाच्या टेलर कॅलीने सांगितले की, त्याची 19 वर्षाची बायको जॉर्जिया 20 आठवड्यांपुर्वी प्रेग्नेंट होती. तेव्हा एका सोनोग्राफी स्कॅनमध्ये बाळाला एका भयानक आजार असल्याचे कळाले. पोटातल्या बाळाच्या मनक्याच्या हाडाचा काही भाग विकसित झालाच नव्हता.  जर त्या बाळाने तश्याच परिस्थीतीत जन्म घेतला असता तर ते बाळ जन्मताच अपंग झाले असते. नंतर डॉक्टरांनी केला चमत्कार...


- इंग्लंडमध्ये राहणाऱ्या कपलला जेव्हा त्यांच्या बाळाच्या आजाराबद्द्ल कळाले तेव्हा ते दोघे खुप घाबरले होते. डॉक्टरांनी बाळाच्या  अपंग होण्याची दाट शक्यता वर्तवली होती.

 

- टेलर आणि त्याच्या बायकोला काय करावे कळत नव्हते. तेव्हा त्यांना डॉक्टरांनी सांगितले की, जर्मनीत पोटातील बाळाचे ऑपरेशन करणे शक्य आहे. 


कर्ज काढून गेले जर्मनीला

- टेलर आणि त्याच्या बायकोने पक्के ठरवले कि काही जरी झाले तरी ते बाळाला अपंग होऊ देणार नाहीत. त्यांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी विकून आणि 10 लाखांचे कर्ज काढून जर्मनीला गेले आणि तेथे ऑपरेशन केले.

 

पोटाच्या आत झाले ऑपरेशन

- डॉक्टरांनी 26व्या आठवड्यात पोटातल्या बाळायचे ऑपरेशन केले आणि तिच्या पाठीत 3.5 सेंटीमीचरची क्लीप लावली.


- ऑपरेशन झाल्यानंतर जॉर्जियाला प्रीमेच्योर डिलिव्हरी झाली, आणि 9 आठवडे आधीच तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला.

 

बातम्या आणखी आहेत...